मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल (Katrina kaif Vicky kaushal) यांनी नुकतीच लग्नगाठ बांधत सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली. कोणालाही कल्पना नसतानाच या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली आणि या नात्याच्या प्रवासातचा लग्नाचा टप्पाही त्यांनी ओलांडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय आलिशान आणि भव्य अशा फोर्ट बरवारातील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये कतरिना विकीचा शाही विवाहसोहळा पार पडला. 


मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीनं त्यांनी लग्नगाठ बांधली. यावेळी विकीसोबतच कतरिनाच्या कुटुंबीयांची खास उपस्थिती होती. 


खासगी जीवनात अतिशय संघर्षात्मक दिवसांतून पुढे आलेल्या कतरिनाला काही खास व्यक्तींची साथ मिळाली. विकीआधीही तिला ज्यांची साथ होती, त्या होत्या तिच्या बहिणी. 


बहिणींशी असणारं कतरिनाचं भावनिक नातं तिच्या लग्नाच्याच वेळी समोर आलं. ज्यावेळी जिथं भाऊ बहिणीला घेऊन लग्नाच्या मंडपात येतात तिथेच कतरिनाला मात्र तिच्या बहिणींनी मंडपापर्यंत आणलं. 


हा क्षण तिच्याही डोळ्यात नकळतच पाणी आणून गेला असणार. अतिशय गोड आणि तितक्याच भावनिक अशा या क्षणाचा फोटो तिनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


कॅप्शनम्ये कतरिना लिहिते, 'मोठं होत असताना आम्ही पहिणी कायमच एकमेकांच्या संरक्षणार्थ उभ्या होतो. त्याच माझा भक्कम आधारत्संभ आहेत. 


एकमेकींना तग धरुन राहण्यास आम्ही मदत करतो. हे सर्वकाही पुढेही असंच सुरु राहो...'



कतरिनानं लिहिलेलं हे कॅप्शन आणि तिच्या लग्नातील फोटो पाहताना तिचं आणि तिच्या बहिणींचं नातं नेमकं कसं आहे याचीच जाणीव होत आहे. 



बहिणींसोबतच्या फोटोंव्यतिरिक्त सध्या कतरिनाचे आणखी काही फोटोही समोर आले आहेत. यामध्ये तिचा संपूर्ण लेहंगा आणि एकंदर ब्रायडल लूक दिसत आहे. 


लग्नासाठी टिला वर्क असणाऱ्या एका क्लासिक लाल रंगाचा मटका सिल्क लेहंगा तिनं निवडला होता. यावर वेल्वेटवर जरदोसी वर्क करण्यात आलं होतं. 


अनकट हिऱ्यांची 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची सांगड तिनं घातली होती. हातात साजेसे कलिरे आणि डोक्यावर दुहेरी माथापट्टी असा तिचा एकंदर लूक होता.