मुंबई : बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफने राजस्थानमध्ये नुकतेच सातफेरे घेतले आहेत.  विकी-कतरिनाच्या लग्नानंतर हे दोघं इंडस्ट्रीमधील मित्र-मैत्रिणींसाठी मुंबईत रिसेप्शन ठेवणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या पार्टीत बॉलिवूडचे हे सेलिब्रीटि मात्र सामिल होणार नाहीयेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पादुकोण 
कतरिना कैफच्या आधी   दीपिका पादुकोण रणबीर कपूरची गर्लफ्रेंड होती.  खरंतर कतरीनासाठी रणबीरने दिपीकाला धोका दिला होता. त्यामुळे या रिसेप्शन पार्टीत दीपिका पदुकोण सामिल होणार नाहीये.


हरलीन सेठी 
हरलीन सेठी विक्की कौशलची एक्स गर्लफ्रेंडी होती. असं म्हटलं जातं की, या दोघांचं नातं खूप वाईटरित्या तुटलं आहे. यासाठी ती या पार्टीत सामिल होणार नाही. 


रणबीर कपूर
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. अशा परिस्थितीत पाहता रणबीर कपूरला रिसेप्शन पार्टीला बोलावण्यात आलेलं नाही. रणबीर कपूर आता आलिया भट्टला डेट करत आहे जी पूर्वी कतरिना कैफची खूप चांगली मैत्रीण होती.


सलमान खान
सलमान खान देखील कतरिना कैफचा एक्स बॉयफ्रेंड आहे. जरी कतरिना कैफचं त्याच्या कुटुंबासोबतचं बॉन्डिंग चांगलं असलं तरी सलमान खान मात्र लग्नाला उपस्थित नव्हता. यानंतर तो रिसेप्शन पार्टीतही सहभागी होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शाहरुख खान
शाहरुख खान कतरिना कैफचा खूप चांगला मित्र आहे. शाहरुख खान सध्या खूप टाइट शेड्यूलमध्ये बिझी आहे. शाहरुख पठाण आणि इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्यालाही पार्टीला जाता येणार नाहीये.


आलिया भट्ट
कतरिना कैफ आणि आलियाच्या मैत्रित बराच बदल झालाय. याच कारणा म्हणजे रणबीर कपूर आहे. कतरिना कैफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर आलियाला डेट करत आहे. त्याचबरोबर आलिया सध्या RRR या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती देखील या पार्टीत सामिल होणार नाहीये.