मुंबई : कतरिना कैफचं एक्टिंग स्किल भलेही चांगलं नसेल..पण तरीही कतरिनाची गणती बॉलिवूडच्या टॉप एक्ट्रेसमध्ये होते. कठोर मेहनतीच्या जोरावर कॅट आज इथपर्यंत पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढचं काय तर तिच्या आगामी 'जग्गा जासूस' सिनेमातील भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी तब्बल १०० तास एकाचं खोलीत स्वत:ला बंदिस्त करुन घेतलं होतं. 


रणबीर कपूर आणि कतरिना स्टारर 'जग्गा जासूस' या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या सिनेमात कॅट पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी तब्बल १०० तास एकाचं खोलीत स्वत:ला बंदिस्त करुन घेतलं होतं. 


कतरिनाने पूर्ण १०० तास एकाच खोलीत रिपोर्टरचं बोलणं, त्यांचा प्रश्न विचारण्याचा अंदाज आणि त्यांच्या बॉडी लॅंग्वेजचं निरीक्षण केलं. यासाठी कतरिनाने पत्रकारांवर आधारित सिनेमे, व्हिडिओजं तर बघितलेचं शिवाय अनेक पुस्तकांचंही वाचनं केलं. 


बाप रे बाप... एव्हढ्या तयारीची अपेक्षा तुम्ही एखाद्या 'परफेक्शनिस्ट'कडूनचं करु शकता. पण एक्स बॉयफ्रेण्डच्या सिनेमासाठी कतरिना घेत असलेली मेहनत खुपचं कौतुकास्पद आहे. खुद्द कतरिनानेचं हे काम किती कठिण होतं हे कबूल केलंय.  


खरंच कॅटला मानायला हवं... अभिनयाची जाण नसतांनाही फक्त कठोर मेहनतीच्या जोरावर तिने स्वत:चं वेगळं स्थान आज बॉलिवूडमध्ये निर्माण केलंय. त्यामुळे जग्गा जासूससाठी तिने घेतलेली मेहनत आता सिनेमासाठी किती लाभदायक ठरते हे तर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरचं कळेल.