नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता अभय देओल आज आपला ४२ वा जन्मदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १५ मार्च १९७६ ला मुंबईत झाला.  अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या खास अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


'सोचा न था'तून पदार्पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान वयातच त्याने आपल्या करियरला सुरुवात केली. शाळेतील नाटकं आणि थिएटरमधून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायला सुरूवात केली.


२००५ मध्ये इम्तियाज अलीच्या 'सोचा न था' सिनेमातून त्याने पदार्पण केले. हा सिनेमा काही बॉक्स ऑफिसवर काही जादू करू शकला नाही. 


मिले दोबारा 



'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये कतरिना आणि अभय देओलने एकत्र काम केले.


या सिनेमात फरहान अख्तर आणि ऋतिक रोशनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. फोटो शेअर करत 'मिले दोबारा' असे कॅप्शन देत कतरिनाने अभयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.