Sam Bahadur Special Screening: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांची जोडी बी-टाऊनमध्ये खूपच लोकप्रिय आहे. लग्नापासून ते लग्नानंतरही त्यांच्यातील बॉन्डिंग खूपच स्पेशल आणि खास आहे. तर कतरिना कैफही विकीसोबतच त्याच्या कुटुंबालाही तितकच प्राधान्य देते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Katrina Kaif and Vicky Kaushal)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्की कौशलची मुख्य भूमिका असलेला सॅम बहादूर चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. तर, अलीकडेच या चित्रपटाचे मुंबईत स्क्रिनिंग ठेवण्यात आले. इथे विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्याव्यतिरिक्त हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पोहोचले होते. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. अशातच विकीच्या कुटुंबीयांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 



विक्की कौशलला पाठिंबा देण्यासाठी त्याचा पूर्ण परिवार स्क्रिनिंगसाठी उपस्थित होता. या दरम्यान कतरिनाची सासु-सासऱ्यांसोबत खास बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. एका व्हिडिओतून ही खास झलक तुम्ही पाहू शकता. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडिओत कतरिना कैफ तिच्या सासू-सासऱ्यांसोबत चित्रपटगृहांतून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी चित्रपटागृहाबाहेर असलेल्या गर्दीतून ती तिच्या सासूबाईंना व्यवस्थित प्रोटेक्ट करताना दिसत आहे. कतरिनाचा हा काळजी घेतानाचा स्वभाव पाहून नेटकऱ्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे. 


व्हिडिओवरती अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, बॉलिवूडमधील एकमेव ही अभिनेत्री आहे जी परदेशी असतानाही तिच्याबद्दल कधीच वाईट ऐकलं नाही किंवा तिला तश्या रुपात बघितलं. म्हणूनच ती बेस्ट सून आहे. तर, एकाने म्हटलं आहे की, कोणताही ड्रामा नाही ना कोणती ओव्हर अॅक्टिंग. सध्या कतरिनाचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.