मुंबई : बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ अनेकांसाठी आता लकी चार्म ठरू लागली आहे. सलमान, रणबीरपाठोपाठ आता खुद्द बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टलाही कतरिनाच आपल्या सिनेमासाठी लकी चार्म वाटू लागली आहे. म्हणूनच आमिरने कतरिनाला आपल्या ठग्ज ऑफ हिंदोस्तान या ड्रीम प्रोजेक्टमध्ये अखेर घेतलं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून कतरिना बिझी शेड्युलमध्ये होती. नुकत्याच रणबीरसोबतच्या जग्गा जासूसच्या शूटिंगनंतर आता कुठे कतरिनाने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे हीच संधी साधत आमिरने कतरिनाला आपल्या आगामी सिनेमासाठी गळ घातलीये. अखेर आमिरच्या आग्रहापुढे कतरिनाला होकार द्यावाच लागला.