नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सिनेमाच्या सेटवरील फारच कमी गोष्टी बाहेर येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत सेटवरून केवळ आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचे लूक्स समोर आले. पण यातून सिनेमाबाबत काहीच कळत नाही. तर कतरिनाने नुकताच आमिर आणि फातिमा सना शेख यांच्यासोबतच एक फोटो सोशल मीडियात शेअर केला. ज्यानंतर लोकांनी आमिर खान याला ट्रोल करणे सुरू केले आहे.


यामुळे ट्रोल झाला आमिर खान


कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये आमिर खान कतरिनापेक्षा उंच दिसत आहे. बस त्यानंतर लोकांनी विचारला की, आमिर कतरिनापेक्षा उंच कसा दिसतो. हा फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिले की, ‘ठग्स...माझे प्रिय आमिर आणि फातिमा’. या फोटोत आमिर मध्यभागी आहे. तर दोन्ही बाजूला दोन अभिनेत्री उभ्या आहेत. 



टायगर जिंदा है नंतर कतरिनाचा मोठा सिनेमा


सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केलं. त्यानंतर सर्वांच्या नजरा आता ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’कडे लागल्या आहेत. यात कतरिनासोबत ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख सुद्धा असणार आहे. त्यामुळे कतरिनाची काय भूमिका असेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 


सेटवर मोबईल बॅन


‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ च्या सेटवरून आत्तापर्यंत जितकेही फोटो समोर आलेत ते एकतर ब्लर आहेत नाही तर दूरून घेतले गेले आहेत. आमिर त्याच्या या सिनेमाबाबत फारच सतर्क आहे. सिनेमाबाबत काहीच लीक होऊ नये याबाबत त्याने खूप काळजी घेतली आहे. त्यामुळेच त्याने सेटवर मोबाईल बॅन केलाय.