मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कैशलच्या लग्नाच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोघे लग्न करणार असल्याचं समोर येत आहे. लग्नाच्या चर्चांदरम्यान कतरिनाच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. कतरिनाला आठ भावंड आहेत. एवढंच  नाही तर कतरिना लहान असताना तिचे वडील आई विभक्त झाले.  आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर कतरिनाच्या आईने सर्व भावंडांचा सांभाळ  केला. कतरिनाचे वडील ब्रिटिश उद्योगपती होते. तर तिची आई  Suzanne Turquotte इंग्लिश वकील आणि समाजसेवकआहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनाला तीन मोठ्या बहिणी स्टेफनी, क्रिस्टीन आणि नताशा, एक मोठा भाऊ मायकेल, तीन लहान बहिणी मेलिसा, सोनिया आणि इसाबेल आहेत. कतरिना लहान असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. अशा परिस्थितीत त्यांच्या आईने एकटीनेचं मुलांचा सांभाळ केला. आईने आपल्या मुलांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. 


कतरिनानेही एकदा एका मुलाखतीत याचा उल्लेख केला. तिने सांगितले होते की, आईने लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचं संपूर्ण जीवन दिलं. या काळात आम्ही कोणी वडिलांच्या संपर्कात नव्हतो.. यावेळी कतरिनाने तिच्या शिक्षणाबद्दल देखील सांगितलं. 



कतरिनाचे शिक्षण होम स्कूलिंगच्या माध्यमतून झाले आहे.  लंडनमध्ये झालेल्या फॉशन शोच्या माध्यमातून कतरिनासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते कैजाद गुस्ताद यांनी प्रथमच तिला पाहिले आणि 'बूम' चित्रपटाची ऑफर दिली. तिचा पहिला चित्रपट 'बी ग्रेड' होता आणि चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर तिच्यावर टिकेची झोड उठवण्यात आली.


कतरिनाचे खरे नाव Katrina Turquotte असे होते. पण तिचे आडनाव फार कठीण असल्यामुळे 'बूम' चित्रपटाच्या निर्मात्या आएशा श्रॉफ यांनी तिचे नाव कतरिना कैफ केले. कतरिनाने तिच्या कारकिर्दीत दिलेले अनेक चित्रपट हिट ठरले तर काही चित्रपट रूपरी पडद्यावर अपयशी देखील ठरले. कतरिनाने आतापर्यंत एकून 25 पेक्षा जास्त पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.