मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील एका खास गाण्याच्या शुटिंगसाठी सलमान खान, कॅटरिना कैफ सह 'टायगर जिंदा है' ची टीम ग्रीसमध्ये पोहचली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम टप्प्यातील हे गाणं शूट केल्यानंतर परताना तेथील एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


एअरपोर्टवर कॅटरिना एका लहान मुलासोबत शॉपिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका लहान मुलाला कॅटरिनाने  उचलून घेतले आहे. त्यावेळेस कॅटरिना त्याला विचारते तुला कोणते खेळणे पाहिजे ? यावर हे पाकिट उघडं असं मुलगा म्हटल्यावर कॅटरिना त्याला म्हणते हे उघडलं तर आपल्याला पैसे द्यावे लागतील. 



 


कॅटरिना आणि त्या मुलाचा गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायारल होत आहे. 


'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल 'टायगर जिंदा है' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक वर्षांनी कॅटरिना आणि सलमान एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता आहे. आतापर्यंत केवळ या चित्रपटातील सलमान आणि कॅटरिनाचा दमदार लूक पोस्टरच्या माध्यमातून रसिकांसमोर आला आहे.