Kaun Banega Crorepati 14: 'कौन बनेगा करोडपती' (KBC 14) हा शो गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अनेक भारतीय प्रेक्षक या शोकडे माहितीचा लाईव्ह स्त्रोत म्हणून पाहतात. या शोचं 14 वं पर्वास आता सुरूवात झाली. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  स्पर्धकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. अशातच केबीसीच्या एका एपिसोडमध्ये स्पर्धकाने विचारलेल्या प्रश्नांची अमिताभ बच्चन यांनाच भीती वाटल्याचं पहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरात्रीच्या मुहुर्तावर नवी थीम आयोजित करण्यात आली आहे. 9 स्पर्धक क्विझ शो जिंकण्यासाठी शोमध्ये आले होते. त्यावेळी गुजरातच्या स्नेहा नायर यांना अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांच्यासह हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. त्यावेळी स्नेहा नायर यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. 1000 रुपयांसाठी आलेला प्रश्न जिंकल्यावर अमिताभ बच्चन यांनी नायर यांना त्यांच्या कामाविषयी विचारलं.


स्नेहा नायर (Sneha Nair) भौतिक संशोधन प्रयोगशाळेत काम करतात. जी प्रयोगशाळा अंतराळ विभाग संस्थेची आहे. त्यावेळी त्यांनी भारताच्या इस्त्रोचं देखील कौतूक केलं. त्यानंतर स्नेहा नायर यांना 2000 रुपयांसाठी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. त्याच उत्तर देखील नायर यांनी अचूक दिलं. त्यानंतर नायर यांनी थेट अमिताभ बच्चन यांना प्रश्न केला.


स्नेहा नायर यांचा प्रश्न-


अमिताभ बच्चन यांनी नायर यांना त्यांच्या खेळाच्या अनुभवाविषयी विचारलं. मी खेळ खेळते, मला टेनिकोईट खेळ आवडतो. तो मी ऑफिसमध्ये खेळते. तो बॅडमिंटनसारखा खेळ आहे, असं नायर यांनी सांगितलं. त्यावर अमिताभ बच्चन यांना कोणता खेळ आवडतो, असा सवाल नायर यांनी विचारला.


सर मी ऐकले आहे की टेनिस हा तुमचा आवडता खेळ आहे आणि याव्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणताही खेळ आवडतो का जो तुम्ही तुमच्या लहानपणी खेळत होता?, असं नायर यांनी विचारलं.



अमिताभ बच्चन यांचं उत्तर -


त्यावर उत्तर देताना, भारतात क्रिकेट (Cricket) एक असा खेळ आहे, जो सर्वजण खेळतात. शाळकरी मुलं देखील खेळतात, सगळेच खेळतात. आता खेळण्याबद्दल बोलू नका नाहीतर सर्व शुन्य होईल, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं. अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच त्यांच्या खेळाच्या आवडीवर खुलासा केला आहे. अनेकदा अमिताभ बच्चन फुटबॉल खेळताना दिसतात.