Amitabh Bachchan यांची 100 कोटींची बिझनेस ऑफर चर्चेत
Amitabh Bachchan यांचा `शार्क टॅंक 2` च्या परिक्षकांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी बिग बींनी किती कोटींच्या रुपयांची मागणी केली आहे.
Amitabh Bachchan 100 Cr Offer Shark Tank India : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या शोचे हे यंदाचे 14 वे पर्व सुरु आहे. शोचा आताचा हा शेवटचा आठवडा आहे आणि हा खूप खास आहे. यावेळी 'शार्क टॅंक इंडिया'च्या दुसऱ्या सीझनचे जजही शोमध्ये पोहोचले होते. या एपिसोडमध्ये 'शार्कं टॅंक इंडिया 2' च्या परिक्षकांचे स्वागत करताना दिसणार आहे. या दरम्यान, सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे अमिताभ जेव्हा या सगळ्या परिक्षकांसमोर त्यांच्या बिझनेसची कल्पना ठेवतात तेव्हा सगळे शार्क हे त्यांना 100 कोटी रुपयांची ऑफर देतात.
कौन बनेगा करोडपतीच्या या एपिसोडमध्ये अमिताभ 'शार्क टॅंक 2' चे परिक्षक नमिता थापर, पीयूष बन्सल, अमन गुप्ता, विनिता सिंग, अनुपम मित्तल, अमित जैन यांचे स्वागत केले आहे. त्यानंतर अमिताभ त्यांच्यासमोर एक कल्पना मांडतात, ज्यावर हे परिक्षक 100 कोटींची ऑफर देतात. खरंतर बिग बी शोमध्ये येताना टिश्यू बॉक्स आणतात आणि त्यांची बिझनेसची कल्पना या सगळ्या परिक्षकांना सांगतात. ते म्हणतात, 'मला एबी टिश्यूच्या नावाने टिश्यू बॉक्स विकायचे आहेत. त्यांना असे अनेक महिलांसाठी करायचे आहे. तर प्रोडक्ट्सच्या एका फेरीची चाचणी झाली असून परिक्षकांना यात पैसे गुंतवायचे आहेत का? यावर Shaadi.com चे अनुपम मित्तल म्हणतात, 'जर हा टिश्यू बॉक्स तुमच्या नावावर विकला गेला तर मी 100 कोटी रुपये द्यायला तयार आहे.' यावर अमिताभ म्हणतात, 'तुम्ही मला गुंतवणुकीच्या 25% रक्कम साइनिंग अमाउंट म्हणून द्याल का?'
एबी टिश्यू म्हणजे काय
खरं तर, अमिताभ बच्चन यांच्या या पीचच्या मागे असलेलं कारण म्हणजे जेव्हापासून त्यांनी 14 व्या पर्वाचे सुत्रसंचालन करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून अनेक विशेषत: महिला स्पर्धक त्यांच्यासमोर भावूक झाल्या आहेत. यावर लगेच बिग बी त्यांना टिश्यू देतात आणि अश्रू पुसायचे आणि खिशात ठेवायचे. त्यावर आता बिग बी म्हणाले की त्यांनी सुत्रसंचालनाचं काम गमावलं तर ते नंतर टिश्यू सेल्समन म्हणून नक्कीच काम करू शकतात. याच कारणामुळे बिग बींनी ही कल्पना शार्क समोर ठेवली आणि त्याचं नाव 'एबी टिश्यू' दिले.
बिग बींनी एक भावनिक चिठ्ठी लिहिली
अलीकडेच, अमिताभ बच्चन यांनी या शोसाठी गुडबाय नोट लिहिली. त्यांच्यासाठी आणि संपूर्ण 'कौन बनेगा करोडपती 14' च्या टीमसाठी हे किती कठीण आहे हे त्याने सांगितले.