Kaun Banega Crorepati 15 : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अमिताभ बच्चन देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, ते दररोज काही ना काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बिग बी कौन बनेगा करोडपती 15 हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहेत. ज्यामध्ये तो स्पर्धकांसोबत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही शेअर करतात. सोमवारचा एपिसोड खास होता ज्यात समाजासाठी चांगलं काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या एपिसोडमध्ये रणदीप हुडा समाजसेविका मुक्ता पुणतांबेकरसोबत आला होता.


या एपिसोडमध्ये आलेले गेस्ट सोशल मीडियाच्या व्यसनाबद्दल बोलले. रणदीपने सांगितलं की, गेमच्या व्यसनामुळे एक महिला आपल्या मुलाचा जीव घेणार होती. त्यानंतर महिलेला स्क्रीन अॅडिक्शन असल्याचं समजलं. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या व्यसनावरही चर्चा केली.


बीग बींना लागलं सोशल मीडियाचं व्यसन
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, त्यांना सध्या सोशल मीडियाचं व्यसन लागलं आहे. ते बोलताना म्हणाले, मी तुम्हाला सांगतो, गेल्या काही दिवसांपासून माझं निरीक्षण आहे की, ब्लॉग लिहिता-लिहीता आपण ते छापूया, म्हणून मी त्यातून काहीतरी काढून त्यावर पोस्ट करतो. मग पुढची व्यक्ती काय बोलतेय हे जाणून घेण्यासाठी एक सवय होऊन जाते. ज्याच्याशी आपला काहीही संबंध असो वा नसो, दीड ते दोन तास यातच निघून जातात. तुम्हाला हे कळतच नाही आणि नंतर जेव्हा लक्षात येतं की, चार वाजले आहेत. ही खूप वाईट सवय आहे.


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर अमिताभ बच्चन नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गणपत चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात क्रिती सेनन आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसले होते. बिग बींचे सध्या अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ते लवकरच प्रभास आणि दीपिकासोबत कल्की 2898 मध्ये दिसणार आहे.