Kaun Banega Crorepati 16 1 Crore Question Answer : छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती 16’ या शोमुळे रोज प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडते असे अनेकांचे म्हणणे आहे. ज्ञानाच्या बळावर लोक कसे लखपती आणि करोडपती होतात हे या शोच्या माध्यमातून आपण पाहत असतो. 12 ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या या शोचं सुत्रसंचालन अमिताभ बच्चनच करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये आदिवासी स्पर्धक बंटी वाडिवानं 50 लाख रुपयांपर्यंत योग्य उत्तर देत 1 कोटींच्या प्रश्नापर्यंत मजल मारली, पण त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ न शकल्यानं शोला पहिला करोडपती भेटला नाही. तर तुम्ही देऊ शकता का या प्रश्नाचे उत्तर...


काय होता तो प्रश्न?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोमध्ये आल्यानंतर बंटी वडिवान यांनी 50 लाख रुपयांसाठी असलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण ते 1 कोटी रुपयांच्या प्रश्नावर येईल अडकले. तर तो प्रश्न काय होता हे जाणून घेऊया...


बंगाल मूर्तिकार चिंतामोनी कर यांना 1948 मध्ये द स्टॅग नावाच्या त्यांच्या एका कलाकृतीसाठी त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला होता? 


A. पायथगॉरस पुरस्कार


B. नोबेल पुरस्कार


C. ऑलम्पिक पदक


D. ऑस्कर पुरस्कार


या प्रश्नाचं योग्य उत्तर हे C. ऑलम्पिक पदक आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बंटी वाडिवानं 1 कोटींसाठी असलेल्या प्रश्नावर खूप विचार केला. ते दोन ऑप्शन्समध्ये गोंधळले होते त्यांच्या डोक्यात पायथगॉरस पुरस्कार हा ऑप्शन येत होता. पण ते त्यांच्या या उत्तराला घेऊन ठाम नव्हते आणि त्यांनी तिथेच गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. 


हेही वाचा : 'भाजप खासदारासोबत असं होत असेल तर...', कंगना रणोतच्या सोशल पोस्टवरून चर्चांना उधाण


बंटी यांनी तिथेच गेम संपवल्यानं पुन्हा एकदा ‘कौन बनेगा करोडपती 16’ या शोला त्यांचा पहिला करोडपती भेटला नाही. दरम्यान, बंटी यांनी गेम संपवल्यानंतर हॉटसीटवर ऑलम्पिक पदक विजेता मनु भाकर आणि अमन सहरावत आज हॉटसीवर आल्याचे पाहायला मिळेल. यावेळी ते दोघं अमिताभ यांच्याशी अनेक मजेशीर गोष्टींवर चर्चा करताना दिसतील. दोघं पुन्हा एकदा शोमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते हे उत्सुक आहेत.