मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती ११'मुळे चर्चेत आहे. या सीजनच्या दुसऱ्या भागात बिग बींनी एका स्पर्धकाला काही प्रश्न विचारले. यावेळी बिग बींनी स्पर्धकाला PUBG या गेमचा फुल फॉर्म काय? असा प्रश्न विचारला. बिग बींच्या या प्रश्नावर स्पर्धक अतिशय गोंधळून गेला. त्यानंतर काही वेळ विचार केल्यानंतर त्याने लाइफलाइन वापरण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाइफलाइन ऑडियंस पोलच्या वापरानंतर जवळपास ९२ टक्के जनतेने PUBGचा फुलफॉर्म PlayerUnknown's Battlegrounds सांगितलं. स्पर्धकाने जनतेच्या उत्तरासह जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं उत्तर योग्य ठरलं.


'पोकेमॉन', 'ब्लूव्हेल' या गेमनंतर 'पबजी' गेम खेळण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होते आहे. तरुण वर्गाला 'पबजी' गेमचे वेड लागल्याचेच दिसते आहे. सध्याच्या तरुणाईमध्ये PUBG हा ऑनलाईन गेम तुफान लोकप्रिय आहे. पबजी हा ऑनलाईन गेम काही कालावधीतच चांगलाच गाजला. वेग-वेगळ्या ठिकाणी बसून एकत्र हा गेम खेळता येतो. या गेमबाबत मोठी क्रेझ आहे. अशाच या लोकप्रिय PUBGचा फुल फॉर्मच बिग बींकडून विचारण्यात आला.