Kavita Kaushik Got Trolled After Slams Netizens : अभिनेत्री असो किंवा मग अभिनेता कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचवेळा ते ट्रोलिंगचा शिकारही होतात. कविता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच अभिनेत्री कविता कौशिकला (Kavita Kaushik) सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. त्यावर कवितानं सडेतोड उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कवितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. कवितानं मोनोकिनीतील हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कवितानं वेगवेगळ्या पोज देत बीचवरचे हे फोटो शेअर केले आहेत. हे व्हिडीओ शेअर करत काळजी घ्या! आता केस आधीसारखे मोठे होत आहेत. तिचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. त्यावर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 41 वर्षांची कुरुप दिसणारी स्त्री. कविताच्या चाहत्यांनी जेव्हा ही कमेंट पाहिली तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला खूप सुनावलं. इतकंच काय तर कवितानं स्वत: यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ट्रोलरला सडेतोड उत्तर देत कविता म्हणाली, "मी 42 वर्षांची असून खूप सुंदर आहे आणि हॉटही तितकीच आहे. तुमच्या घरचे तुम्हाला पाळण्यात ठेवून विसरून गेले. तुम्हाला खूप खूप प्रेम, मला वाटतं की तुम्ही देखील खूप चांगले आहात फक्त तुम्हाला प्रेम मिळालं नाही." कवितानं अशा प्रकारे त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर दिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. कवितानं केलेली ही पोस्ट पाहता एक नेटकरी कमेंट करत म्हणाला काय 42! या वयात तू इतकी पॉजिटिव्ह. तुमच्या आयुष्या संपूर्ण जगा. अशा प्रकारे ट्रोल करणाऱ्यांना विसरून जा. आणखी एका नेटकऱ्यानं कमेंट करत सांगितलं की मला तुझे सगळे लूक आवडतात, तुला खूप खूप प्रेम. 


हेही वाचा : 'सगळ्यात चांगले घरमालक...', Satish Kaushik यांच्या निधनानंतर भावूक झाला Kartik Aaryan


कविताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, कविताला खरी ओळख ही FIR या मालिकेतून मिळाली आहे. कवितानं या मालिकेत चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारली होती. याशिवाय कविता बिग बॉस 14 मध्ये देखील दिसली होती.