मुंबई : अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो प्रेक्षकांच्या कायमच पसंतीला राहिला आहे. या शो च्या माध्यमातून अनेक स्पर्धकांनी आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. तसेच या शोमधून अनेक समस्यांवर बोट ठेवण्यात आलं. असंच काहीस आताच्या भागात झालं आहे. हुंड्यावर अनेक कायदे, नियम लागू केले. पण अजूनही हुंडा पद्धती बंद झालेली नाही. प्रथेच्या नावाखाली आजही हुंडा घेतला जात असल्याचं समोर आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे शिकलेल्या समाजात देखील ही पद्धत एक परंपरा म्हणून सांभाळली जाते. असाच एक प्रकार केबीसीच्या मंगळवारच्या एपिसोडमध्ये समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशच्या इंदौरमधील सोनल तिवारी हॉट सीटवर आली. तेव्हा तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची गोष्ट समोर मांडली. ही गोष्ट ऐकताच महानायक अमिताभ बच्चन देखील स्तब्ध झाले. सुरूवातीला सोनल खूप शांत खेळत होती. पण जेव्हा तिच्या आयुष्यावर बनवलेला व्हिडिओ दाखवण्यात आला तेव्हा तेथील वातावरण अतिशय गंभीर आणि शांत झालं. तेव्हा सोनल आणि तिच्या आईची गोष्ट समोर आली आणि सोनल - तिची आई आता कुटुंबापासून वेगळं राहतात.


सोनलने सांगितलं की, तिच्या आईने लग्नानंतर एकही सुख अनुभवलं नाही. ती कायम डोमॅस्टिक वायलेंसची शिकार आहे. कारण लग्नानंतर त्यांनी लग्नानंतर हुंडा आणला नव्हता. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला सोनलला खूप शिकवलं आणि तिला प्रोत्साहन दिलं. सोनल आता एमबीआयबीच्या आयटी विभागात असिस्टेंट मॅनेजरच्या पोस्टवर काम करत आहे. मात्र तिची आई आणि ती आता कुटुंबापासून वेगळे राहतात.