मुंबई : स्वप्न साकाराण्यासाठी अनेक जण अमिताभ बच्चन यांचा क्विझ रिअ‍ॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये हजेरी लावतात. आता या रिएलीटी शोचा सीझन १३च्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. १०मे रोजी अमिताभ बच्चन यांनी केबीसी 13चा पहिला नोंदणी प्रश्न विचारला. या शोमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकांना प्रश्न विचारतात आणि उत्तरे देऊन प्रतिस्पर्धी सात कोटी रुपये जिंकू शकतात. केबीसीचा हा 13वा सीझन आहे. 'कौन बनेगा करोडपती' सीझन १२ला चार करोडपती मिळाले होते आणि त्या चारही महिला होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 11 नोव्हेंबर 2020 रोजी नाझिया नसीम एक कोटी रुपये जिंकणारी सीझनमधील पहिली करोडपती ठरली. त्यांच्यानंतर मोहिता शर्मा, अनुपप्पा दास आणि डॉ नेहा शहा यांनीही या कार्यक्रमात एक कोटी रुपये जिंकले. कौन बनेगा करोडपती १२मध्ये चार महिला स्पर्धक करोडपती ठरल्या, मात्र या सीझनमध्ये कोणालाही 7 कोटी रुपये मिळवता आले नाहीत.


नाझिया नसीमसाठी एक कोटीचा प्रश्न होता
अमिताभ बच्चन यांनी नाझिया नसीमला एक कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारला होता - महासागर के सबसे गहरे बिंदु, मारियारा ट्रेंच तक पहुंचने वाली पहली महिला और पूर्व अंतरिक्ष यात्री कौन हैं? या प्रश्नाचे पर्याय होते - A.सॅली राइड, B.वेलेंटीना टेरेस्‍कोवा C.स्‍वेतलाना सवित्‍स्‍काया  D.कॅथरीन डी. सुल्विन.


नाझियाने तिची शेवटची लाईफलाईन  FLIP THE Question वापरली. प्रश्न बदलण्यापूर्वी नाझियाने सी. C.स्‍वेतलाना सवित्‍स्‍काया हा पर्याय निवडला होता. जे उत्तर चुकिचं होतं. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते- डी. कॅथरीन डी. सुल्विन.


FLIP THE Questionनंतर मिळाला हा प्रश्न
लाइफलाईन फ्लिप द क्वेशननंतर नाझिया नसीमला एंटरटेंन्मेट कॅटेगरीमधून एक कोटी रुपयांसाठी नवीन प्रश्न विचारला होता इनमें से किस अभिनेत्री ने कभी एक पार्श्‍व गायिका का नॅशनल फिल्म पुरस्‍कार जीता था। याचे पर्याय होते  A.दीपिका चिखलिया  B.रूपा गांगुली C.नीना गुप्‍ता D.किरण खेर. खूप विचार करुन उत्तर  B.रूपा गांगुली या उत्तराची नाझियाने निवड केली, जे उत्तर बरोबर होतं.


सात कोटींसाठी अमिताभ बच्चन यांनी नाझिया नसीम यांना विचारलं होतं- नेता जी सुभाषचंद्र बोस ने सिंगापुर में कहां सबसे पहले आजाद हिंद फौज की उद्घोषणा की थी?


याचे पर्याय होते - A.कॅथे सिनेमा हॉल  B. फोर्ट  कैनिंग पार्क C. नेशनल यूनिवर्सिटी ऑफ सिंगापुर D. नेशनल गैलरी सिंगापुर नाझिया नसीमला या प्रश्नाचा अंदाज नव्हता आणि तिने शो सोडला. तिने गेम सोडण्यापूर्वी एक पर्याय निवडला- C. नेशनल यूनिवर्सिटी ऑफ सिंगापुर हे चुकीचे उत्तर होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं- A.कॅथे सिनेमा हॉल.