Amitabh Bachchan on Unmarried Women Being Burden to Family : 'कौन बनेगा करडोपती' हा कार्यक्रम सगळ्याच प्रेक्षकांच्या ज्ञानात भर टाकत असल्याचे आपण पाहत आहोत. रोज या सेटवर एक नवीन व्यक्ती हॉटसीटवर बसते आणि त्या प्रत्येकाकडून आणि अमिताभ बच्चन यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आता या शोचं 16 वं पर्व सुरु आहे. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये कृष्णा सेलुकर नावाचा स्पर्धक हॉटसीटवर असल्याचे आपण पाहिले. कधी इंजिनियर असलेल्या कृष्णाची नकरी कोव्हिड-19 दरम्यान, गेली. तर स्वत: ची भावनिक गोष्ट सांगत कृष्णानं अविवाहित महिलांना 'ओझं' म्हटलं आहे. हे ऐकताच बिग बींनी जी प्रतिक्रिया दिली त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा असं होतं की फक्त अमिताभ बच्चन नाही तर स्पर्धकही अशा काही गोष्टींचा खुलासा करतात ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळे भावूक होतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये कृष्णा सेलुकरनं त्याला ओझं म्हटलं आहे. हे ऐकताच त्यांनी कृष्णा यांना थांबवलं आणि त्यांना एक काही गोष्टी सांगितल्या. कृष्णानं इंजीनियरिंगची डिग्री असूनही जॉब लेस असल्याचं सांगत स्वत: ची तुलना ही अविवाहित महिलांशी केली आहे. तो म्हणाला, 'सर, जर मी म्हटलं की लग्न केलं नाही तर मुली या घरच्यांवर ओझं असतात. एका वयानंतर जॉबलेस मुलं देखील आई-वडिलांवर तितकंच ओझं ठरतात.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कृष्णाचं हे वक्तव्य ऐकताच अमिताभ बच्चन कृष्णाला तिथेच थांबवतात आणि बोलतात की 'महिला या ओझं नसतात. ते म्हणाले, 'एक सांगू तुला. मुलगी असते ना, ती कधीच ओझं होऊ शकत नाही. महिला ही खूप मोठी शान असते.' अमिताभ यांनी केलेलं हे वक्तव्य ऐकताच तिथे उपस्थित असलेलेल सगळेच टाळ्या वाजवू लागतात.


हेही वाचा : हस्तर पुन्हा येतोय! सोहम शाहने दिले Tumbbad 2 चे संकेत, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत


दरम्यान, त्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोध्ये अमिताभ बच्चन बोलताना दिसत आहेत की 'नेहमी ज्या महिला या नोकरी करत नाही, त्या सांगायला लाजतात की त्या गृहिणी आहेत. ज्या गृहिणी आहेत ना त्यांच्याशिवाय जास्त काम आणि मेहनत दुसरं कोणी करत नाही. त्या सगळ्यात जास्त मेहनती असतात. त्या संपूर्ण घर सांभाळतात. नवऱ्याला सांभाळतात. खायचं-प्यायचं, मुलांचं सगळं काही सांभाळतात. त्याशिवाय त्या रात्र होण्याची प्रतीक्षा करतात की जोपर्यंत नवरा घरी येईल आणि मुलं जेवून झोपतील. तोपर्यंत त्या शांतीनं जेवू शकत नाहीत.'