KBC 16 मध्ये येण्यासाठी 97 दिवस ठेवला उपवास; कळताच अमिताभ यांनी केलं असं कृत्य, उठले अन्...
KBC 16 Amitabh Bachchan : KBC 16 मध्ये येण्यासाठी चक्क स्पर्धकानं 97 दिवस ठेवला उपवास...
KBC 16 Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपति सीजन 16' हा कार्यक्रम सतत चर्चेत असतो. प्रत्येक एपिसोडला येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची गोष्ट त्यांचा संघर्ष सांगतात. शालिनी शर्मा नावाच्या एका स्पर्धक महिलेनं तिच्या मुलाच्या अवस्थेविषयी सांगितलं. त्यानंतर अमिताभ यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर आता स्पर्धक श्रीम शर्मा आईच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी शोमध्ये पोहोचली होती. तिच्या आईला तिला हॉटसीटवर बसल्याचे पाहायचं होतं आणि आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे.
श्रीम हा कामानं ज्योतिष आहेत. त्यानं KBC 16 मध्ये येण्यापासून हॉटसीटवर बसण्यापर्यंत 97 दिवसांचं व्रत करण्याचा संकल्प केला होता. त्याचं म्हणण आहे की कोणत्याही मोठ्या गोष्टीला मिळवण्यासाठी मोठ्या त्यागाची गरज असते. तर श्रीमचं उपास तोडण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी श्रीमला त्यांची आवडती मिठाई रसमलाई खाऊ घातली. त्यानंतर श्रीमनं सांगितलं की त्याचं संपूर्ण खानदान हे ज्योतिष आहे. तो त्याच क्षेत्रात पुर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवत आला आहे.
श्रीमचं म्हणणं आहे की भविष्यात तो क्रिकेटर होऊ शकत होता कारण त्याला क्रिकेटमध्ये करिअर करायची इच्छा होती. पण त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो पुढे खेळू शकला नाही. त्यामुळे तो आता वेगळ्याच क्षेत्रात पुढे जात आहे. त्यासोबत तो ट्रॅव्हल व्लॉगिंग देखील करतो. त्याचे ट्रेकिंग करतानाचे आणि डोंगर चढतानाचे व्लॉग सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांनी सांगितलं की शोमध्ये येण्यासाठी त्यानं किती कठीण तपस्या केली. जेव्हा मला इथे येण्यासाठी कॉल आला तेव्हा मी 97 दिवसांचं व्रत करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून हॉटसीटवर येई पर्यंत, मी फक्त फळं खातोय.
हेही वाचा : सलमान खाननंतर AP Dhillon च्या घरावर गोळीबार!
श्रीमनं केलेला हा खुलासा ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे आश्चर्यचकीत झाले आणि त्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. श्रीम सिलेक्ट झाल्यानंतर त्याची आई आनंदानं रडू लागली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी श्रीमच्या आईला विचारलं की आता तरी आनंदी आहे का तर त्याची आई म्हणाली की हो आता मी आनंदी आहे. पुढे श्रीमची आई म्हणाली ही त्याची तपस्या आणि व्रत आहे. हा एपिसोड आज 2 सप्टेंबक रोजी रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे.