KBC Income Tax Debuty Commissioner: अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चे सध्या 15 वे पर्व सुरू आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. यावेळी अमिताभ बच्चन हे आपल्याला क्विझमास्टरच्या भुमिकेतून दिसत असून शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची भुमिकाही ते खूप सुंदररीत्या निभावत आहेत. त्यामुळे विशेषत: त्यांची सर्वत्र चर्चा आहे. गेली 22 वर्षे हा रिएलिटी शो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो आहे. या शोनं अनेकांना करोडपती बनवलं असून सेलिब्रेटीही बनवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्य माणसांना लखपती आणि करोडपती बनवण्याचे काम या शोनं केले आहे. या शोचा प्रत्येक एपिसोड हा तितकाच विशेष असतो. या शोमधून अनेकांच्या आठवणी आहेत हेही तितकेच खरे. त्याचसोबत या शोमधून अनेक सरप्राईझींग गोष्टीही घडल्या आहेत. त्यामुळे या शोची कायम चर्चा रंगलेली असते. सध्या या शोमध्ये अशीच एक सरप्राईझींग घटना घडली आहे ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चनही दचकले आहेत. 


अमिताभ बच्चन यांच्या या शोमधून अनेक विविध प्रातांतील, संस्कृतीतील आणि पेशाची माणसं स्पर्धक म्हणून आली आहेत. नुकताच या शोचा 56 वा एपिसोड हा 30 ऑक्टोबर रोजी ऑन एअर आला होता. बिग बींनी हा एपिसोड फॅमिली स्पेशल वीक म्हणून अहमदाबादच्या ट्रॅफिक त्रिवेदी यांच्यासोबत सुरू केला होता. त्यांनी 3,20,000 रूपये या शोमधून जिंकून घरी नेले होते. त्यानंतर बिग बी यांनी दुसरा फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा राऊंड खेळला ज्यातून हॉट सिटवर बसण्यासाठी दिल्लीच्या नेहा, विकास आणि गरिमा जाखर यांना मान मिळाला. 


हेही वाचा : माधुरी दीक्षितची डुप्लिकेट म्हणून ओळख; एका फिल्मनंतर सोडली इंडस्ट्री अन्... फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?


यावेळी आपल्या स्पर्धकांची ओळख करून घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरूवात केली होती. तेव्हा गरिमा आणि विकास यांनी त्यांना सांगितले की ते दोघंही इंकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये डेप्यूटी कमिशनर्स आहेत. त्यावेळी अमिताभ बच्चन आपल्या खुर्चीवरून उतरले आणि मग त्यांनी त्या दोघांना नमस्कार केला तेव्हा शोमध्ये उपस्थित प्रेक्षक हसू लागले. तेव्हा त्यांनी असाही विनोद केला की संपुर्ण इंकम टॅक्स डिपोर्टमेंटच हॉट सीटवर बसले आहे. तेव्हा ते असंही म्हणाले की आपल्याला त्यांची भीती वाटते आणि मला कृपया घाबरवू नका. त्यांना पाहून पुढे बिग बी म्हणाले की मी तर एरवी स्पर्धकांचे स्वागत हे नमस्कारनं करतो आता मी तुमचे स्वागत हे डबल नमस्कारनं करतो आहे.