माधुरी दीक्षितची डुप्लिकेट म्हणून ओळख; एका फिल्मनंतर सोडली इंडस्ट्री अन्... फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

Farheen Prabhakar: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्रीची. तिची तुलना अनेकदा माधुरी दीक्षितशी करण्यात आली होती. आपल्या पहिल्या चित्रपटानंतर तिनं अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर परत ती बॉलिवूडमध्ये फिरकली नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 31, 2023, 08:02 PM IST
माधुरी दीक्षितची डुप्लिकेट म्हणून ओळख; एका फिल्मनंतर सोडली इंडस्ट्री अन्... फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?  title=
madhuri dixit looklike actress farheen prabhakar what does she doing now

Farheen Prabhakar: माधुरी दीक्षित ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिच्यासारखं आपणही दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. सध्या आपल्या हटके स्टाईलनं ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना मोहात पाडते आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. तुम्हाला माहितीये का की अशा अनेक तरूणी-अभिनेत्री होत्या ज्यांचा चेहरा हा माधुरी दीक्षितशी अत्यंत मिळता जुळता होता. त्यांमुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. अशी एक अभिनेत्री होती जिचा चेहरासुद्धा माधुरी दीक्षितशी मिळता जुळता होता. त्यामुळे तिचीही जोरात चर्चा होती. परंतु सध्या ही अभिनेत्री कुठे आहे तुम्हाला माहितीये का? सध्या तिची जोरात चर्चाही आहे. माधुरीच्या काळात म्हणजे 90 च्या दशकात ही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय होती. तिची सर्वत्र चर्चा रंगलेली असायची. या अभिनेत्रीचं नावं आहे फरहीन प्रभाकर. 

1992 साली प्रदर्शित झालेला 'जान तेरे नाम' मधून तिनं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. जेव्हा ती या इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिची तुलना ही थेट माधुरी दीक्षित यांच्यासोबत झाली कारण त्या दोघींचा चेहरा हा खूप मिळता जुळता होता. मिडिया रिपोर्टनुसार त्यांना माधुरी दीक्षित नंबर 2 म्हटलं जायचं. 

'जान तेरे नाम' या चित्रपटानंतर त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून देखील तिनं आपल्या करिअरला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांनी क्रिकेटर मनोज प्रभाकर यांच्याशी लग्न केले होते. त्यानंतर परत ती कधीच मनोरंजन क्षेत्रात वळल्या नाहीत. त्यांनी आपल्या घर संसारावर अधिक भर दिला कारण त्यांना त्यांच्या घरात ज्याप्रमाणे घरफूटी झाली तशी आपल्या बाबतीत होऊ द्यायची नव्हती. आता फरीन ही 50 वर्षांची झाली आहे. सोबतच मनोज प्रभाकर यांनीही क्रिकेट सोडून दिले असून तेही आता बिझनेसमन झाले आहेत. त्यांच्या वडिलांनीही तीन लग्न केले होते. 

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर परत बॉलिवूडची कास धरली नाही. तर अशाही अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पहिल्याच चित्रपटानं मोठा ब्रेक दिल्यानंतर नंतर परंत कधीच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नाही परंतु त्यांची त्यानंतरही बरीच चर्चा रंगलेली होती.