वयाच्या 79 व्या वर्षी बिग बींना लग्नाचं प्रपोजल; कुटुंबीयांनाही बसेल धक्का
अशा गप्पा गोष्टींमुळे या शोची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.
KBC 14 : बीग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bahchan) अभिनयातले देव मानले जातात. तिच्या अभिनयाचा आदर्श आजही अनेक तरूण कलाकार घेताना दिसतात. किंबहूना बीग बींचे चित्रपट आजही तितकेच लोकप्रिय आहेत आणि आजही तरूण पिढीही आनंदानं त्यांचे चित्रपट पाहते. त्याच्या डायलॉग्जची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. (kbc contenstant mona kumari says she want a husband like amitabh bachchan)
अमिताभ बच्चन यांचा सर्वात लोकप्रिय ठरलेला शो कौन बनेगा करोडपती (Koun Banega Crorepati) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमधून अनेक स्पर्धकांची स्वप्न पुर्ण झाली आहेत. तसेच या शोमध्ये येणारे स्पर्धक हे अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा गोष्टी करतात. त्यातून हे स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्याकडे नाना तऱ्हेच्या मागण्याही करत असतात. या मागण्यांमुळे अमिताभ बच्चनही अनेकदा आश्चर्यचकित होतात. तसेच कधीकधी त्यांचे वक्तव्यही इतके जगावेगळे असते की त्यामुळेही अमिताभजीचं काय उपस्थित प्रेक्षकांनाही हसू आवरता येत नाही. अशा गप्पा गोष्टींमुळे या शोची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्या या शोच्या अशाच एका महिला स्पर्धकानं हजेरी लावली होती. तेव्हा या स्पर्धकांनंही अमिताभ बच्चन यांच्यासमोर असंच एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. केबीसीच्या शोमध्ये निवड झाल्यावर मोना कुमारी (Mona Kumari) यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हॉट सीटवर बसताच ती भावुक झाली आणि रडू लागली. मोनाला रडताना पाहून बिग बी म्हणाले की ही एक प्रथाच झाली आहे इथे. जर इथे येणारे स्पर्धक असेच रडत राहिले तर मला टिश्यू मॅन होल्डरचा जॉब मिळू शकतो. तेव्हा मोना आपल्या अश्रु पुसतात आणि खेळ पुढे जातो.
मोना ही मेडिकलमध्ये एजन्सी मॅनेजर आहे. मोना तिच्या भावासोबत केबीसीमध्ये आली होती. शो दरम्यान ते तिला विचारतात बॉलिवूडचा कोणता अभिनेता आवडतो का? यावर मोनाने उत्तर दिले, "मला रणबीर कपूर (Ranbir Kapoor Marriage) आवडायचा पण आता त्याचं लग्न झालं आहे." यावर अमिताभ विचारतात की तिला अविवाहित अभिनेता आवडतो का? तुम्हाला कोणाशी लग्न किंवा डेट करायचं आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना मोना म्हणते, "सर, अशी कोणतीही खास लिस्ट नाही, परंतु मुलगा तुमच्यासारखा 6 फूट उंच असावा, आणि त्याची तुमच्यासारखीच खूप क्यूट फ्रेंच कट दाढी असावी.'' मोनाच्या बोलण्यावर बिग-बी आश्चर्यचकित झाले.
केबीसी 14 (KBC 14) च्या एपिसोडमध्ये बिहारच्या पटना येथील मोना कुमारी नावाच्या मुलीने शोचे बोट राउंड क्लिअर केले आहेत. केबीसीची पुढची खेळाडू म्हणून मोना कुमारीची निवड होताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. हॉट सीटवर बसताच मोना कुमारी भावूक झाली आणि रडू लागली. मोनाला रडताना पाहून बिग बी म्हणाले की, ही एक प्रथा बनली आहे आणि जर खेळाडू असेच रडत राहिले तर त्यांना टिश्यू मॅन होल्डरचे काम मिळू शकते. अमिताभ बच्चन मोनाचे अश्रू पुसतात आणि खेळ पुढे नेतात.