KBC 15 Suhana Khan : 'कौन बनेगा करोडपति 15' हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोकडे प्रेक्षक एक मनोरंजनचा शो आणि माहितीचा शो म्हणून पाहतात. नुकताच या शोचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या शोचा नुकताच एक एपिसोड प्रदर्शित झाला. या एपिसोडमध्ये दुसऱ्या राऊंडसाठी अदिती, वेदांग रैना आणि खुशी कपूर हॉट सीटवर येतात. तर तिसऱ्या राऊंडसाठी सुहाना खान आणि झोया अख्तर एकत्र येतात. त्यावेळी त्यांनी काय धम्माल केली आणि त्याशिवाय सुहानाला तिच्या वडिलांना म्हणजेच शाहरुख खानला आजवर कोणाता पुरस्कार मिळाला याविषयी माहित नव्हतं हे पाहुन सगळ्यांना आश्चर्य झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या राऊंडला हॉटसीटवर बसलेल्या खुशी कपूरला बिग बी विचारतात की तुला अभिनय करणं किंवा या सगळ्या गोष्टीं नवीन किंवा कठीण नसतील कारण तू अशा कुटुंबात मोठी झाली आहेस. पण तुझा पहिला शूटिंगचा अनुभव कसा होता? खुशी उत्तर देत म्हणाली मी खूप घाबरले होते. आम्ही त्यावेळी उटीत होतो आणि माझी बहीण जान्हवी काही दिवसांपासून तिथेच होती. त्यावर उत्तर देत खुशी म्हणाली की जेव्हा मी घाबरायचे तेव्हा ती मला शांत करायची. ती माझ्याशी बोलायची आणि मला शांत वाटू लागायचं. मला आठवण आहे की लहाण असताना जेव्हा माझे आई-वडील शूटिंगवर असायचे तेव्हा मी सेटवर खेळायचे. त्यानंतर वेदांग आणि अदिती एक गाणं गातात आणि अगस्त त्यांच्यासोबत जॉइन करतो. त्यानंतर ते अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन नंदाशी देखील बोलतात. तीसऱ्या आणि शेवटच्या राऊंडला सुहाना खान आणि झोया हॉट सीटवर वेदांगसोबत येतात. 


सुहाना येताचं प्रेक्षकांना तिची ओळख करून देत बिग बी म्हणाले की जे लोक सुहानाला ओळखत नाही, त्यांच्या सांगू इच्छितो की ही शाहरुख खानची लेक आहे. त्यानंतर सुपर संदूक राऊंड ते खेळतात आणि शाहरुख खान संबंधीत एक प्रश्न तेव्हा त्यांच्या समोर येतो.


काय होता प्रश्न?


बिग बी विचारतात की 'शाहरुख खानला आतापर्यंत खालील दिलेल्या पैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही?'


ऑप्शन असतात 
A. पद्म श्री 
B. लीजन ऑफ ऑनर
C. एल'एटोइल डी'ओर
D. वोल्पी कप
सुहाना या प्रश्नाचं उत्तर देत ऑप्शन A निवडते, मात्र, त्याचं योग्य उत्तर हे ऑप्शन D. वोल्पी कप आहे. हे ऐकल्यानंतर सुहानाला आश्चर्य होतं.  तर झोया आणि वेदांग तिच्याकडे पाहू लागतात. यावरून सुहानाला रिअॅक्ट करत बिग बी म्हणाले की 'लेकीला माहित नाही की वडिलांना कोणता पुरस्कार मिळाला आहे. आम्हाला तर आल्यावर सांगितलं की जो समोर बसला आहे, त्यांनं शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तर थोडे सोपे प्रश्न विचारू. इतका सोपा प्रश्न विचारला की त्याचं उत्तरच देऊ शकली नाही.'