What!!! डान्स शोच्या स्पर्धकाला सलमानमुळं मिळालं 1.2 कोटींचं मानधन, पाहा कोण आहे `तो` नशिबवान
KBKKJ Movie Raghav Juyal Fees : किसी का भाई किसी की जान या चित्रपटात नुकताच सलमान खान दिसला. सलमान नेहमीच अनेक नवीन कलाकारांना संधी देताना दिसतो. या चित्रपटासाठी देखील सलमाननं अनेक नवीन कलाकारांना संधी दिली. यावेळी सलमाननं डान्स शो रिअॅलिटी शोच्या स्पर्धकाला संधी दिली आहे.
KBKKJ Movie Raghav Juyal Fees : लोकप्रिय डान्सर राघव जुयाल नुकताच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला. राघवला खरी ओळख ही डान्स इंडिया डान्सचा स्पर्धक आणि स्लोमो किंग म्हणून मिळाली होती. राघवनं त्यानंतर अनेक डान्स शोचे सुत्रसंचालन केले. इतकंच काय तर त्यानं एबीसीडी 2 या चित्रपटात काम करत त्याच्या अभिनयाची जादू सगळ्यांवर केली. या चित्रपटात राघवनं सलमान खानच्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला असला तरी त्या सगळ्यात चर्चा आहे ती राघव जुयालच्या मानधनाची आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटानं 12 दिवसात बॉक्स ऑफिसवर 104.15 कोटींची गल्ला केला आहे.
राघवनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यात त्याचा हा सलमान खानसोबत असलेला चित्रपट. राघवनं या चित्रपटासाठी 1 कोटी 20 लाख रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. पण याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण ज्या प्रकारे राघवची भूमिका या चित्रपटात महत्त्वाची होती. त्याप्रकारे राघव जुयालनं इतकं मानधन घेतलं असेल असं म्हटलं जातं आहे. सलमानच्या भावाची भूमिका राघवनं साकारली आहे.
राघवच्या फिल्मी करिअरविषयी बोलायचं झालं तर त्यानं आजवर अनेक मजेशीर भूमिका साकारल्या आहेत. तर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात राघवनं सलमान खानचा लहाणभाऊ इश्कची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटात राघव आणि शहनाज गिल म्हणजेच सुकून रिलेशनशिपमध्ये असल्याचे दाखवण्यात आले. त्याच्या अभिनयासोबतच राघवची कॉमेडी टायमिंगनं किसी का भाई किसी की जान या चित्रपटाला मजेशीर बनवलं आहे.
हेही वाचा : Bharat Jadhav नं सोडली मुंबई? 'सपनो का शहर' सोडण्यामागचं खरं कारण समोर
किसी का भाई किसी की जान चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेची मुख्य भूमिका होती. तर या चित्रपटात राघव, जगपति बाबू, भूमिका चावला, भाग्यश्री, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, विजेंदर सिंग, विनाली भटनागर, जस्सी गिल आणि वेंकटेश यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन हे फरहाद सामजी यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे.