मुंबई : सध्या लेखक दिग्दर्शक केदार शिंदे   (Kedaar Shinde) त्यांच्या आगामी 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shaheer)  या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा सिनेमा  लोकप्रिय कलाकार शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे.  कलेसाठी त्यांची धडपड सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केदार शिंदे सिनेमातून करणार आहे. सध्या त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केदार शिंदे यांनी शेअर केलेली पोस्ट शाहीर साबळे यांच्या लेकीने लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शाहीर साबळे यांचा जीवनप्रवासच उलगडला आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.


काय आहे केदार शिंदे यांच्या पोस्टमध्ये?
प्रवास
'काळ कीती झपाट्याने बदलत जातो नाही! एक काळ होता अगदी स्वातंत्र्य मीळाल्यानंतर लगेचचा..अजुन गावोगावी धड रस्ते झाले नव्हते, प्रवासाची साधनं खेड्यापाड्यात पोचली नव्हती आणि मुळात म्हणजे वीज अजुनही शहरी भागांनाच दिपवत होती तो काळ..


शाहीर साबळे म्हणजे आमचे बाबा तोवर खेड्यापाड्यातच कार्यक्रम करत असत..कधी दहा,बारा कोसाच अंतर असे तर कधी पंधरा,वीस कोसाचही मग धुळभरल्या रस्त्यावरचा वाद्य डोक्यावर,हाता,खांद्यावर अडकवून कीत्येक कोसांचा पायी प्रवास सुरु व्हायचा...


कीत्येक ठीकाणी कार्यक्रमानंतर मीळणारं जेवण हीच बीदागी असायची पण तरुण वय होत त्यामुळे काही करुन दाखवायची मनात जीद्द होती..कधी रस्ता चुकला तर चार,पाच कोस अजुन पायपीट व्हायची..



पण कष्ट केले की दिवस पलटतातच..लवकरच शाहीरांनी मुंबईत बस्तान बसवल आणि एक सेकंडहँण्ड गाडी वीकत घेतली..मधे मधे बंद पडणारी,धक्का द्यावा लागणारी..खर तर शाहीर उत्तम ड्रायव्हर होते ते ड्रायव्हींग कसे शीकले हा संशोधनाचा विषय आहे पण तरीही त्यांनी गाडीवर मुणगेकर नावाचे ड्रायव्हर ठेवले होते...


पुढे आयुष्यात त्यांनी बर्याच नव्याकोर्या गाड्या घेतल्या...जीप हा त्यांचा गाड्यांमधला आवडता प्रकार..बरीच वर्ष त्यांनी जीपमधून सर्व कलावंतासह महाराष्ट्र पींजून काढला..पुढे नवीकोरी चेसी घेऊन त्यावर पस्तीस सीटर आरामबस पण बनवून घेतली...त्यानंतर लोकधारा करताना नव्या २४ सीटर गाडीतून ४० कलावंत बसवून परत महाराष्ट्रभर फीरले..


पण तरीही त्यांच्या आठवणीत शेवटपर्यंत राहीला हा पायपीट करत केलेला प्रवास...त्यावेळी हातावर भाकरी घेऊन केलेल जेवण, पाटाच्या पाण्यात धुळीने माखलेले हातपाय धूण आणि सतत गाऊन बसलेला आवाज सुटण्यासाठी जेष्ठमध, कंकोळ वगैरे औषध घेण्यासाठी त्यांच्या राजेंद्र बावीसकर या सुशिक्षीत मीत्राने प्रेक्षकांसमोर पैशासाठी पसरलेला हात...'