मुंबई : चाणाक्य नीतीमध्ये जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणाक्य नीतीमध्ये खासगी आयुष्य, नोकरी, व्यवसाय, मित्र, शत्रू जीवनातील विविध पैलूंवर विचार मांडले आहेत. लोकांना चाणाक्य नीतीतील काही गोष्टी कठोर वाटतात. पण व्यतीला चूक आणि  बरोबर यांच्यातील भेद कळायला मदत होते. आचार्य चाणक्य यांची धोरणे माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा उल्लेख एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला विसरूनही करू नये. तसे केल्यास त्याला नुकसान सहन करावे लागू शकते. जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत.


आपले दु:ख कोणाला सांगू नका
अनेकदा जेव्हा आपण  दुःखी असते तेव्हा मनातील गोष्टी सांगण्यासाठी  जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करतो. ज्यामुळे आपल्याला काही प्रमाणात का होईना पण आधार मिळतो. पण  पण आचार्य चाणक्य म्हणतात की, अशा गोष्टी कोणालाही सांगू  नका. तुमचा खास मित्र असला तरी नाही... कारण ती व्यक्ती तुमचं सांत्वन करेल. पण तुमच्या मागून अशा गोष्टी इतरांना मोठ्या करून सांगेल. 


पती-पत्नीमध्ये होणाऱ्या गोष्टी कोणाला सांगू नका
नवरा-बायकोचं नातं खूप खास असतं. अशा परिस्थितीत या नात्यात तिसऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप करू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की वैवाहिक जीवनाशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत की ज्या फक्त पती-पत्नीमध्येच राहायला हव्यात. या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला कळाल्या तर वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होऊ शकते.


आर्थिक नुकसानाबद्दल कोणाला सांगू नका
आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला कर्जही घ्यावे लागू शकते. पण अशा गोष्टी स्वतःकडे ठेवा. जर तुम्ही या गोष्टी इतरांना सांगितल्या तर एक, ते लोक तुमच्यापासून अंतर ठेवू लागतील. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)