... विराट कोहली आणि तमन्ना भाटियाला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस
काय आहे कारण...
मुंबई : भारती. क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि अजु वर्गीजला केरळ उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी तिघांना नोटीस बजावण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट, तमन्ना आणि अजु हे ऑनलाईन रम्मी गेमचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. त्यामुळे राज्य सरकारलाही याप्रकरणी भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या गेममध्ये एका व्यक्तीचे पैसे बुडाल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. म्हणून तामिळनाडू सरकारनं बंदी आणण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडू सरकारने सट्टेबाजी सुरु असणाऱ्या ऑनलाइन गेम्स आणि ऍप्सवर बंदी आणली आहे.