मुंबई : मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. केतकीनं तिच्या फेसबुक अकाऊंटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी केतकीला अटक करण्यात आली. पण अटकेदरम्यान तिच्यावर शाईफेक करण्यात आली. यामध्ये तिच्या ब्लाऊजवर शाईचे काही डाग राहिले. आता याच ब्लाऊजवर तिने एक डिझाइन तयार केली आहे. त्याचा व्हिडीओ केतकीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केतकीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ब्लाऊज रंगवताना दिसत आहे. जेव्हा शाईफेक करण्यात आली तेव्हाचे काही फोटो व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहेत. त्यानंतर शाईमुळे खराब झालेला ब्लाऊज ती दाखवत आहे. केतकीनं ब्लाऊजवर जिथं शाई दिसत आहे तिथे रंग भरले आहेत. इतकंच नव्हे तर या ब्लाऊजवर तिनं त्रिशूळ काढलं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीशो शेअर करत “हर हर महादेव” असं केतकीनं म्हटलं आहे. केतकीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी केतकीच्या कलेचं कौतुक केलं आहे. अति सुंदर, तू अगदी हुशार आणि हिंमतीनं प्रसंगांना सामोरं जाणारी मुलगी आहेस, तुला अधिक बळ मिळो अशा अनेक सकारात्मक कमेंट नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओवर केल्या आहेत.


केतकी जवळपास महिनाभर कारागृहात होती. केतकी कारागृहातून जेव्हा बाहेर आली तेव्हा तिनं ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती. केतकीनं या सगळ्या प्रसंगांचा हिंमतीनं सामना केल्यामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.