मुंबई : सुपरस्टार यशच्या 'केजीएफ चॅप्टर 2' या चित्रपटाची जगभरात धुमाकूळ आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'KGF 2' ने मोठ्या चित्रपटांचं रेकॉर्ड उद्ध्वस्त केलं आहे. आता या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत, जे तुमला आश्चर्यचकित करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात रॉकी भाईचा बोलबाला  
यशच्या 'KGF Chapter 2' या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडियावर 'KGF 2' च्या कलेक्शनची ताजी माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की 'KGF 2' ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1104.73 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


केजीएफ 2 चं वर्ल्डवाइड कलेक्शन
पहिला आठवडा - 720.31 करोड
दूसरा आठवडा - 223.51 करोड
तीसरा आठवडा- 140.55 करोड


चौथा आठवडा
पहिला दिवस - 11.46 करोड
दूसरा दिवस - 8.90 करोड
टोटल कलेक्शन - 1104.73 करोड



'KGF 2' हा दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे
मनोबाला यांनी सांगितलं की, 'KGF Chapter 2' हा 1100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चौथा भारतीय चित्रपट ठरला आहे. अलीकडेच ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'KGF Chapter 2' ला सांगितलं की, चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सुपरस्टार प्रभासच्या 'बाहुबली 2' नंतरचा हा दुसरा चित्रपट आहे. ज्याने हा विक्रम पार केला आहे.