मुंबई : 'केजीएफ' सिनेमाला रीलीज होऊन सध्या महीना होत आला असला तरी अद्याप या सिनेमाची क्रेझ कायम आहे. प्रत्येक सिनेमागृहात अद्याप हाच सिनेमा चालतो आहे. त्यात आता KGFच्या चाहत्यांसाठी दु;खद बातमी समोर येत आहे.  KGF फेम अभिनेत्याचे निधन झाल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यामुळे KGFच्या चाहत्यांमधून शोक व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 14  एप्रिल 2022 रोजी केजीएफ 2 सिनेमा प्रदर्शित झाला. रीलीजनंतर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची रांगच्या रांग सिनेमागृहात लागली होती. केजीएफ 2 सिनेमाच्या डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. 


'केजीएफ 1' प्रमाणे 'केजीएफ 2' सिनेमाने बक्कळ कमाई केली. आतापर्यत 'केजीएफ'ने 397.95 करोडची कमाई केली. आता केजीएफ 3  सिनेमा देखील येणार असल्याने प्रेक्षकांना त्याची उत्सुकता लागली आहे.  


दरम्यान 'केजीएफ 2' यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या सिनेमातील अभिनेता मोहन जुनेजा (Mohan Juneja)यांचे आज 7 मे 2022 ला सकाळी निधन झाल्याची बातमी समोर आली. मोहन जुनेजा मोठ्या आजाराचा सामना करत होते.  गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी बंगळुरूच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  


केजीएफमध्ये नेमकी कोणती भूमिका केली ?


'केजीएफ चॅप्टर 1' मध्ये मोहन जुनेजा यांनी भूमिका साकारली होती. या सिनेमात मोहन जुनेजा यांनी पत्रकार आनंदीच्या इनफॉर्मरची भूमिका साकारली होती. फार कमी सेकंदाचा हा शॉर्ट होता. मात्र जुनेजा यांचा तो डायलॉग फार गाजला होता. 


दरम्यान, मोहन जुनेजा हे साऊथ सिनेसृष्टीतले मोठे नाव आहे. जुनेजा यांना 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.  मोहन जुनेजा (Mohan Juneja) यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी सिनेमात अभिनय केला आहे.  


साऊथ सिनेसृष्टीतले अभिनेते मोहन जुनेजा यांनी 'चेलता' सिनेमापासून आपल्या करीअरची सूरूवात केली. या सिनेमातली त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 


मोहन जुनेजा यांनी  'वतारा'सारख्या टीव्ही मालिकेतही अभिनय केला आहे. मोहन जुनेजा यांनी केजीएफ चॅप्टर 1 आणि केजीएफ चॅप्टर 2 मध्ये अभिनय केला होता. दरम्यान आता मोहन जुनेजा यांच्या निधनानंतर प्रेक्षकांमधून शोक व्यक्त होत आहे.