मुंबई : अक्षय कुमारने पान मसाल्याची जाहिरात करून चाहत्यांची माफी मागितल्याच्या घटनेनंतर आता KGF स्टार अभिनेता यशने पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी करोडोंची ऑफर नाकारली आहे. अजय देवगन, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर अक्षय कुमारने पान मसाला जाहिरात केली. ज्यामुळे तो सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला. यानंतर अक्षय कुमारने चाहत्यांची माफी मागितली आणि कंपनीसोबतचा हा करार मोडल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करोडोंचा करार यशने नाकारला
KGF-2 सुपरस्टार यशने पान मसाला आणि वेलचीच्या ब्रँडसाठी करोडो रुपयांची एंडोर्समेंट ऑफर नाकारल्याची बातमी समोर आली आहे. यशसाठी एंडोर्समेंट डील हाताळणारी एजन्सी एक्सीड एंटरटेनमेंटने या बातमीला दुजोरा दिला आहे. अर्जुन बॅनर्जी, टॅलेंट अँड न्यू व्हेंचर्स हेड, एक्सीड एंटरटेनमेंट यांनी एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, "पान मसाला आणि अशा उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर खूप हानिकारक परिणाम होतो."


काय विचार करुन घेतला निर्णय?
तो पुढे म्हणाला 'या गोष्टींच्या वापरामुळे लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यशने घेतलेला हा एक अतिशय समंजस कॉल होता, त्याने हा करार नाकारला आहे जो त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या खूप मोहक होता. त्याचे फॉलोअर्स, चाहते आणि गोष्टींमधली त्याची आवड लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला आहे.


अक्षय कुमार ट्रोल 
अर्जुन म्हणाला, "देशभरात त्याची लोकप्रियता पाहता, त्याच्या लोकप्रियतेचा उपयोग योग्य संदेश देण्यासाठी व्हावा. अशी आमची इच्छा आहे." चांगल्या गोष्टींचा प्रचार करायचा आहे. असंही तो म्हणाला. सार्वजनिक पान मसाला आणि गुटखा यासारख्या गोष्टींच्या प्रचारासाठी लोक बॉलिवूडच्या सुपरस्टार कलाकारांना खूप ट्रोल करत आहेत.