सेलिब्रिटी मुलगा कोट्यवधींचं मानधन घेऊनही वडिलांना का करावी लागतेय ड्रायव्हरची नोकरी ?
. तेव्हा जगण्याचा हा प्रवास मान मागे वळवून पाहताना ...
मुंबई : कित्येकदा असं होतं की, आपण जीवनात अमुक एका वेळी इतक्या आव्हानांचा सामना करतो आणि तमुक एका वेळी आपण याच्या पूर्ण विरुद्ध परिस्थितीत, हेवा वाटेल असंच आयुष्य जगत असतो. तेव्हा जगण्याचा हा प्रवास मान मागे वळवून पाहताना ज्या भावना मनात दाटून येतात त्या शब्दांतही मांडता येणार नाहीत अशाच असतात. (Actor Yash)
आयुष्याचा असाच प्रवास करुन मोठा झालेला एक अभिनेता आज प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहे. कन्नड कलाजगतामध्ये ज्याचाय सुपरस्टार म्हणून उल्लेख केला जातो, तो हा अभिनेता म्हणजे यश.
KGF या चित्रपटामुळे यश जास्तच प्रकाशझोतात आलाय. नवीन कुमार गौडा, असं त्याचं खरं नाव. कर्नाटकातील बूवनहल्ली या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला.
यशचे वडील हे स्थानिक परिवहन संस्थेमध्ये काम करत होते. ते BMTC मध्ये चालक म्हणून सेवेत होते. सूत्रांच्या माहितीनुसार मुलगा आज यशाच्या शिखरावर असूनही यशचे वडील मात्र आजही हीच नोकरी करताना दिसतात.
यशची आई, एक गृहिणी आहे. त्याच्या बालपणीचा बरात काळ म्हैसूर येथे गेला. यशनं पुढं शिक्षण पूर्ण करत लहानमोठ्या भूमिका साकारल्या आणि पाहता पाहता तो प्रसिद्ध होऊ लागला.
कन्नड कलाविश्वात त्याच्या नावाभोवती प्रसिद्धीचं वलय तयार झालं. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या KGF या चित्रपटानं त्याच्या प्रसिद्धीमध्ये अशी काही भर टाकली की, भल्याभल्या प्रस्थापितांना हादरा बसला.
जागतिक स्तरावर यश प्रसिद्धीझोतात आला आणि त्याचंच नाव सर्वांच्या ओठी पाहायला मिळालं. तिथं रुपेरी पडदा गाजवत असतानाच यशनं आपल्या कुटुंबालाही तितकंच प्राधान्य दिलं.
अभिनेत्री राधिका हिच्याशी लग्नगाठ बांधणारा यश आज दोन मुलांच्या पालकत्त्वाची जबाबदारी सांभाळत करिअर आणि कुटुंबात सुरेख समतोल राखताना दिसत आहे.