Independence Day 2024 Box Office Clash: 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. यावेळी एक-दोन नव्हे तर चार चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत. अनेक वेळा आपण चित्रपट एकमेकांना भिडताना पाहिले आहेत. ज्यामध्ये कोणाला फायदा होतो तर कोणाला तोटा होतो. तर कधी कधी दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण, जेव्हा 3 किंवा 4 चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतात तेव्हा यशाची शक्यता कमी होते. त्यामुळे अनेक वेळा निर्मात्यांना बजेटसाठीही पैसे मिळणे कठीण होऊन जाते. 15 ऑगस्ट 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर असाच धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. या दिवशी एक-दोन नव्हे तर चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. कोणते आहेत ते चित्रपट. जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘खेल खेल में’


मुदस्सर अजीजचा मल्टीस्टारर 'खेल खेल में' हा चित्रपटही स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अक्षय कुमारसह, तापसी पन्नू, वाणी कपूर, अपारशक्ती खुरवा, एमी विर्क, प्रज्ञा जैस्वाल, फरदीन खान आणि आदित्य सील यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. खेल खेल में चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. जे पाहण्यास खूपच आकर्षक वाटत आहे.


‘डबल इस्मार्ट’


संजय दत्त स्टारर फिल्म 'डबल इस्मार्ट' हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात संजय दत्तसोबत काव्या थापर, बानी जे, अली, गेटअप श्रीनू, सयाजी शिंदे, मकरंद देशपांडे आणि टेंपर वामसी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 2019 मध्ये आलेल्या 'इसमार्ट' चित्रपटाचा सिक्वेल आहे.


'वेद'


'वेद' हा चित्रपट ॲक्शन, क्राईम ड्रामा यावर आधारित आहे. हा चित्रपट निखिल अडवाणीने दिग्दर्शित केला आहे. यामध्ये जॉन अब्राहमसोबत अभिनेत्री शर्वरी बाग आहे. यासोबतच तमन्ना भाटिया या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची चाहते खूप अतुरतेने वाट बघत आहेत.


'स्त्री 2'


राज कुमार राव, पंकज त्रिपाठी आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'स्त्री 2' 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री'चा सिक्वेल आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई केली होती. मात्र, या चित्रपटाचे बजेट केवळ 25 कोटी रुपये होते. या वेळी देखील निर्मात्यांना पूर्ण आशा आहे की त्याचा स्त्री 2 देखील चमत्कार करेल.


कोण बाजी मारणार? 


यामध्ये दोन चित्रपटांचा बोलबाला आहे. त्यामध्ये राज कुमार रावचा 'स्त्री 2' आणि जॉन अब्राहमचा 'वेद' आहे. हे दोन्ही चित्रपट कुटुंबासमवेत पाहता येतील. त्याच वेळी, या दोघांच्या तुलनेत संजय दत्त आणि अक्षयच्या चित्रपटाचे शब्द कमी आहेत. तरीही, आता अखेर कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करू शकतो हे 15 ऑगस्ट नंतर समजणार आहे.