15 ऑगस्टच्या दिवशी थिएटरमध्ये तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे श्रद्धा कपूरचा 'स्त्री' 2 हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेद' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तिन्ही चित्रपटांमध्ये सध्या 'स्त्री 2' चित्रपट आघाडीवर आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये अक्षय कुमार आणि  जॉन अब्राहम यांच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्यासह या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांच्यासारखे कॉमेडी कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री'चा हा सिक्वेल आहे. 


अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'स्त्री 2' आघाडीवर


अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या कॉमेडी चित्रपटाची चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता स्पष्टपणे बघायला मिळत आहे. 'स्त्री 2' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. याचा अंदाज तुम्ही चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून लावू शकता. आता चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त एक दिवस राहिला आहे. त्याआधी पहिल्या दिवसाच्या शोची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली गेली आहेत. त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. 


'खेल खेल में' आणि 'वेद'मध्ये कोण पुढे? 


अभिनेता जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट श्रद्धा कपूरच्या चित्रपटासमोर फिके पडताना दिसत आहेत. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत सध्या मागे पडलेला चित्रपट म्हणजे अक्षय कुमारचा 'खेल खेल में'. आतापर्यंत या चित्रपटाची फक्त 6 हजार 395 तिकिटे बुक झाली असून या चित्रपटाने केवळ 26.15 लाख रुपये कमाई केली आहे. 


याशिवाय  जॉन अब्राहमचा 'वेद' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, 15 ऑगस्टला दोन दिवस आधी या चित्रपटाने 11, 524 तिकिटे विकून एकूण 32.1 लाखांची कमाई केली आहे. तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.