मुंबई : बॉलिवूडमधील बेस्ट सिस्टर्स म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर. कायम अनेक ठिकाणी दोघींना एकत्र स्पॉट करण्यात येतं. एवढंच नाही तर, अनेक पार्ट्यांमध्ये देखील दोघी त्यांच्या गर्लगँगसोबत आनंद लुटताना दिसतात. जान्हवी आणि खुशी कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलं टाळतात. पण सध्या दोघी बहिणींच्या आयुष्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. खुशी मोठी बहिण जान्हवीच्या एक्स-बॉयफ्रेंडला डेट करत असल्याचं समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूरबद्दल अशी अफवा पसरली होती की, ती तिचा जवळचा मित्र अक्षत राजनला डेट करत आहे. दोघेही अनेकदा चित्रपट स्क्रीनिंग, डिनर आऊटिंग, फॅमिली फंक्शन्समध्ये एकत्र दिसले. नंतर दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचं सांगण्यात आलं. 



आता आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे, खुशी जान्हवीचा एक्स-बॉयफ्रेंड म्हणजे अक्षत राजनला डेट करत आहे. खुशी कपूरने 18 ऑगस्ट 2022 रोजी तिच्या इन्स्टा हँडलवर मिरर सेल्फी शेअर केला होता, ज्यामध्ये ती खूप हॉट दिसत होती. 


फोटोत खुशीने ग्रे रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग जॉगर्समध्ये दिसत आहे. खुशीच्या हॉट फोटोंवर अनेकांना कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला. दरम्यान खुशीच्या फोटोवर अक्षत राजनने देखील कमेंट केली आहे. 


खुशीच्या हॉट फोटोवर अक्षत राजन कमेंट करत  "Ly" म्हणाला. शिवाय त्याने लाल रंगाच्या बदाम इमोजी देखील पोस्ट केले. त्याच्या कमेंटवर खुशी देखील प्रतिक्रिया देत 'iluuuuuu' आणि  लाल रंगाचा बदाम पोस्ट केला आहे. अक्षत राजनने केलेल्या कमेंटमुळे खुशी तुफान चर्चेत आहे. 



खुशीच्या कामाबद्दल सांगायचं झालं आहे, खुशी लवकरच 'द आर्चिज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित सिनेमा 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात खुशी कपूरशिवाय सुहाना खान, अगस्त्य नंदा, मिहिर आहुजा, युवराज मेंडा आणि वेदांग रैना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.