मुंबई : बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर लवकरच 'द आर्चिज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. स्टारकिड लोकप्रियतेच्या बाबतीत आधीच पुढे आहे. अभिनेत्रीचा स्टायलिंग सेन्स आणि फॅशन नेहमीच प्रभावित करताना दिसते.  खुशी कपूर कायम तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. आता देखील खुशीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुशी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि अनेकदा स्वतःचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील खुशीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे आणि चाहते तिचे कौतुक करत आहेत. 



पण काहींनी मात्र खुशीला ट्रोल केलं आहे. खुशीची तुलना उर्फी जावेदसोबत होत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 


खुशीच्या कामाबद्दल सांगायचं झालं आहे, खुशी लवकरच 'द आर्चिज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित सिनेमा 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात खुशी कपूरशिवाय सुहाना खान, अगस्त्य नंदा, मिहिर आहुजा, युवराज मेंडा आणि वेदांग रैना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.