Kiara Advani Birthday: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) आज 31 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसह इतर जणही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, कियाराच्या भावानेही तिला इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने कियारासोबतचा आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही कियाराला ओळखू शकणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कियारा आपला  31 वा वाढदिवस पती सिद्धार्थ मल्होत्रासह साजरा करत आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, यामध्ये ती बिकिनी घालून समुद्रात उडी मारताना दिसत आहे. 'हॅप्पी बर्थडे टू मी... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी तुमची आभारी आहे', असं कॅप्शन कियाराने दिलं आहे.


भावाने शेअर केला लहानपणीचा फोटो


दरम्यान, कियाराचा लहान भाऊ मिशालने इंस्टाग्रामवर लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिशालने यासह इतरही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये दोघांमधील बहिण भावाचं घट्ट नातं दिसत आहे. "हे कसं सुरु झालं आणि कसं चाललं आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा, स्वप्ने खरोखरच सत्यात उतरतात हे मला दाखवल्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जर इतर कोणाला प्रेरणा मिळाली असेल तर, मी केले तसे तुमची नोकरी सोडू नका कारण तुमच्याकडे समान जीन्स नाहीत."



कियारानेही भावाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. "Hahahahha Mishyyyy we've come a long wayyy. Love you lil one" अशी कमेंट तिने केली आहे. 


मिशाल इंस्टाग्रामवर अनेकदा आपल्या बहिणीसोबतचे फोटो शेअर करत असते. लग्नावेळीही त्याने बहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. 



दरम्यान, कियारा अडवाणी सध्या राम चरणसह 'गेम चेंजर' चित्रपटासाठी शुटिंग करत आहे. नुकताच तिचा कार्तिक आर्यनसह 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 


कियारा अडवाणीने 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'जुगजुग जीयो', 'भूल भुलैया 2', 'लस्ट स्टोरीज' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.