Kiara Advani Falls on Stage Video: करीना कपूर, कियारा अडवाणी, सुहाना खान या त्यांच्या नव्या 'टिरा ब्यूटी'च्या जाहिरातीसाठी एकत्र आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यामुळेच त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांच्या या जाहिरातीचा लॉन्च इव्हेंट होता. त्यामुळे त्या तिघींचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. बॉलिवूड म्हटलं की ग्लॅमर आलंच. त्यामुळे महागडे कपडे, हिल्स आणि मेकअपचे नखरेही आलेच.  ग्लॅमरस अभिनेत्रींची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अनेकदा त्या मोठ्या हिल्स घातल्यानं अभिनेत्री कुठेतरी पडतात, अडखळतात, त्यांचा तोल जातो. तेव्हा अशावेळी त्यांची खिल्ली उडवायलाही कोणी मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडियावर असे व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसतात. सध्या असंच काहीच कियारा अडवाणीच्या बाबतीतही घडलं आहे. या जाहिरातीच्या लॉन्चसाठी आलेल्या कियाराला हिल्स घालणं महागात पडलं आणि भर स्टेजवरच ती अडखळली आणि पडता पडता वाचली, असंच म्हणायला हवं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी 'टिरा ब्युटी' या 'रिलायन्स'च्या कॉस्मॅटिक ब्रॅण्डसाठी त्यांनी फोटोशूट केले आहे. यासाठी करीना, कियारा आणि सुहाना एकत्र आल्या होत्या. यावेळी उपस्थितांशी बोलताना कियाराचा तोल गेला आणि तेवढ्यात ती सावरली. स्टेजवर अर्जुन कपूर आणि करीना कपूरही हे दोघंही स्टेजवर उपस्थित होते. तेव्हा त्यांनीही तिला सांभाळयाचा प्रयत्न केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अनेकांनी तिची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे तर अनेकांनी, तिच्या फॅन्सनी तिचे कौतुकही केले आहे. ज्या पद्धतीनं सर्वांसमोर तिनं आपल्याला सावरलं आणि न घाबरता पुन्हा उभी राहिली त्यासाठी सर्वांनीच तिचं कौतुक केलं आहे. 


हेही वाचा : 'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम


हाय हिल्स घातलाना काय काळजी घ्यावी? 


  • आपण जेव्हा हाय हिल्स घालतो तेव्हा आपल्याला टाचांवर फार प्रेशर येते. तेव्हा पायांचा बॅलेन्स ठेवणे आपल्याला काहीच कठीणच जाते. त्यामुळे आपला तोल जाऊ शकतो. मुळात आपले पाय हे सपाट असतात. तेव्हा आपल्याला तळपायांवरच योग्य समतोल राखण्याची सवय असते. त्यामुळे हिल्स घातल्या की हा समतोल खोडासा बिघडतो. 

  • हाय हिल्स घालताना आपल्याला योग्य समतोल आधीच राखता आला पाहिजे. म्हणजे हिल्स घातल्यावर थोडं चालून पाहा. त्यानंतर आपला बॅलेन्स कुठे आहे ते पाहा. त्यातून आपला तोल कुठे जातोय हेही आजमावून पाहा.

  • हाय हिल्स घेणं, घालणं हे प्रत्येक मुलीला आवडत असतं. तेव्हा हाय हिल्स घेण्यापुर्वी आधी तपासून पाहा. आपल्यापरीनंच जर का आपण या गोष्टी तपासल्या तर आपल्यालाही काहीच तसदी होणार नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हिल्स आणि आरोग्य 


महिला या ऑफिसमध्ये,पार्टीला किंवा इतरत्रही हिल्स घालतात. तेव्हा अतिवेळ हिल्स घातल्यानं आपल्याला पायाला दुखापत किंवा सुजंही होऊ शकते. कधी कधी चपल्यांच्या पट्ट्यावरून आपल्या पायाच्या त्वेचेला मुरूमंही येऊ शकतात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)