अबब! आयपीएलमध्ये संघ एका हंगामात कमावतात 'इतके' कोटी, पहिल्यांदाच कमाईचा आकडा समोर

IPL 2025 : आयपीएल 2025 हंगामाला अद्याप बराच कालावधी बाकी आहे. पण त्या आधी मोठ्या घडामोडी घडत आहेत. नव्या हंगामात अनेक संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या काही महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शनही पार पडणार आहे.   

| Oct 07, 2024, 19:47 PM IST
1/7

अबब! आयपीएलमध्ये संघ एका हंगामात कमावतात 'इतके' कोटी, पहिल्यांदाच कमाईचा आकडा समोर

2/7

आयपीएल 2025 साठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यात कोणत्या खेळाडूंना रिटेन केलं जाणार आणि कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. त्यातच नव्या हंगामात अनेक संघांचे कर्णधारही बदलणार असल्याची चर्चा आहे.  (फोटो आभार- सोशल मीडिया)

3/7

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये यावेळी अनेक दिग्गज खेळाडू लिलावात असण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर रेकॉर्डब्रेक बोली लावली जाणार असल्याचीही शक्यताआहे. पण तुम्हाला माहित आहे का खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावणाऱ्या फ्रँचाईजी आयपीएलच्या एका हंगामात किती कमावतात?  ((फोटो आभार- सोशल मीडिया)

4/7

मीडिया रिपोर्टनुसार आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात प्रत्येक संघांची जवळपास 300 कोटी रुपयांची कमाई होते. यातले 160-165 कोटी रुपये खर्च होता. यानंतरही फ्रँचाईजीचा जवळपास 130-140 कोटी रुपयांचा फायदो होतो.  (फोटो आभार- सोशल मीडिया)

5/7

आयपीएल संघांच्या कमाईचं मुख्य स्त्रोत हे सामन्यांची तिकिट विक्री, जाहीराती, चॅम्पियन्स प्राईज मनी, ब्रँड स्पोन्सरशीप, खेळाडूंची जर्स आणइ हेल्मेट या माध्यमातून होतो. अनेक कंपन्या खेळाडूंच्या जर्सी, बॅट, हेल्मेट, ग्लोव्ह्जवर कंपनीचं नाव छापण्यासाठी करोडो रुपये फ्रँचाईजींना देतात. (फोटो आभार- सोशल मीडिया)

6/7

आयपीएलमध्ये विजेत्या संघाबरोबरच उपविजेत्या आणि उपान्त्य फेरीतील संघांनाही करोडो रुपयांचं बक्षीस दिलं जातं. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं. यावेळी केकेआरला 20 कोटी रुपये बक्षीस तर उपविजेत्या सनराईजर्स हैदराबादला 12.5 कोटी रुपये देण्यात आले. (फोटो आभार- सोशल मीडिया)

7/7

आयपीएल 2023 मध्ये बीसीसीआयची कमाई तब्बल 11,769 कमाई झाली होती. जगभरातील कोणत्याही क्रिकेट लीगपेक्षा ही रक्कम कितीतरी जास्त आहे. आयपीएलचे टीव्ही प्रक्षेपण हक्क, ओटीटी हक्क करोडोत विकले जातात. (फोटो आभार- सोशल मीडिया)