मुंबई : अभिनेत्री किआरा आडवाणी (Kiara Advani) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'कबीर सिंग', 'शेरशाह', 'भुल भुलय्या 2' सिनेमाच्या माध्यमातून किआराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या किआराचं शैक्षणिक आयुष्य कसं असेल? अभिनेत्रीचा निकाल कसा असेल?  अशा अनेक प्रश्नांनी चाहत्यांच्या घरात घर केलं असेल. तर एका पोस्टच्या माध्यमातून किआराला बोर्ड परीक्षेत किती टक्के मिळाले.. हे समोर आल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर किआरा आडवाणीचा एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये किआराच्या बारावीच्या टक्क्यांबद्दल सांगितलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पोस्टच्या माध्यमातून किआरा म्हणते, 'कॅथेड्रल शाळेत माझं शिक्षण झालं आहे. त्या शाळेतून बारावी झाल्यानंतर अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. मला बारावीत 92 टक्के होते. पण मला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे जय हिंद कॉलेजमध्ये मास कम्यूनिकेशनसाठी प्रवेश घेतला आणि माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.' असं लिहिलं आहे. 


किआराने स्वतःचं अभिनेत्री व्हायचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे किआरा आडवाणी. किआरा तिच्या प्रोफेशन आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. पण अभिनेत्री खासगी आयुष्याबद्दल देखील जोरदार चर्चा रंगत असतात.