मुंबई : विकी कौशल आणि त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफ लवकरच लग्न करणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या ठिकाणापासून ते पाहुण्यांच्या संख्येपर्यंतची सगळ्याच गोष्टीची माहिती समोर आली आहे. मात्र, या जोडप्याच्या लग्नात कोणत्या सेलेब्सना बोलावण्यात आले आहे, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अभिनेत्री कियारा अडवाणीने सांगितले की, तिला विकी कौशलने तिच्या लग्नाचे निमंत्रण दिलेले नाही.


कियाराने विकीच्या लग्नाबद्दल दिले हे उत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कियारा अडवाणीने नेटफ्लिक्स चित्रपट लस्ट स्टोरीजमध्ये विकी कौशलसोबत काम केले आहे. ती विकीची कोस्टार असल्यामुळे जेव्हा तिला विकीच्या लग्नासंबंधीत प्रश्व विचारण्यात आला की, विकीने तिला या लग्नाचे आमंत्रण दिले आहेत का? त्यावर कियाराने स्पष्ट नकार दिला.


वास्तविक, कियारा एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान, जेव्हा तिला विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, 'खरंच? मी ऐकले आहे पण माहित नाही. मला आमंत्रण मिळालेलं नाही.


सलमान खानला देखील आमंत्रण नाही


मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक कबीर खान, दिग्दर्शक आनंद एल राय यांसारखे सेलिब्रिटी कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला उपस्थित राहू शकतात. परंतु अशा ही बातम्या समोर येत आहेत की, कतरिनाने सलमान खानला लग्नाची पत्रिकाही पाठवली नाही.


इंडिया टुडे.इनच्या वृत्तानुसार, सलमान खानची बहीण अर्पिता खानला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, कतरिनाच्या बाजूने आमच्या कुटुंबाला लग्नपत्रिका पाठवण्यात आलेली नाही.


हे जोडपे राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत


विकी कौशल आणि कतरिना कैफ 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेतील अशा बातम्या आहेत. हे लग्नकार्य ७ डिसेंबरपासून  सुरू होणार आहे आणि ते 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहेत.


यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली, त्यात विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. लग्नाला 120 पाहुणे उपस्थित राहणार आहेत.