मुंबई : बॉलिवूडमधील जोडपी ही सर्वाधिक चर्चेत राहतात. दीपिका-रणवीर (Deepika - Ranveer) असो वा रणबीर-आलिया (Ranbir -Alia), प्रत्येक जोडप्यांची चर्चा ही आजकाल सोशल मीडियावर वेगाने सुरु असते. त्यातीलच एक जोडी आहे ती म्हणजे कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राची (Sidharth Malhotra). मागच्या वर्षी या दोघांचा 'शेहशाह' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्यांच्या चित्रपटाचं खूप कौतुकही झालं होतं. या चित्रपटा दरम्यान हे दोघं एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे कुठेही एकत्र पार्टीमध्ये, वेकेशनला अथवा लग्नसभारंभांना दोघेही कित्येकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. मध्यतंरी त्यांच्या ब्रेकअपच्या (Kiara Advani And Sidharth Malhotra Breakup News) जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ते दोघं एकत्र नाहीत असा समज त्यांच्या चाहत्यांचा झाला होता. परंतु हे फारसे खरे नसून ते दोघं दुबईला कियारा अडवानीच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्त स्पॉट झाले होते. त्यांच्या फॅन्सनीच त्यांच्यासोबत सेल्फीचे फोटो शेअर केले होते. जे आता प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आता कियारानं सोशल मीडियावर सिद्धार्थसाठी एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. 


आणखी वाचा : सगळे रक्षाबंधन साजरा करत असताना हृतिकची Ex- Wife बॉयफ्रेन्डसोबत काय करत होती? Video Viral


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कियारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Kiara Advani Instagram Post) ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'सिद्धार्थ मल्होत्रा तू तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतास, पण तू सुद्धा out of sight, out of mind टाईपचा निघालास', असे कॅप्शन कियारानं ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर करताना दिली आहे. कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 


आणखी वाचा : 'हर हर शंभू' फेम फरमानी नाझचं गाणं Youtube वरून हटवण्याच कारण समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


 


कियारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. 

 


आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


कियाराची ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कियारा आणि सिद्धार्थ सगळ्यात शेवटी एकत्र शेरशाह या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 1 वर्ष पूर्ण झाला आहे. तर पब्लिसिटी स्टंट म्हणून कियारानं ही पोस्ट केली असेल अशी चर्चा देखील सुरु आहे. आता कियारा आणि सिद्धार्थ लवकरच कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत का असा प्रश्न नेटकऱ्यांना आहे. 


आणखी वाचा : ल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय


दरम्यान, कियाराचा 'जुग जुग जियो हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. तर लवकरच कियारा 'गोविंदा नाम मेरा' आणि तेलगू चित्रपट 'RC 15' मध्ये दिसणार आहे. तर सिद्धार्थ 'मिशन मजनू', 'थँक गॉड' आणि रोहित शेट्टीच्या कॉप-ड्रामा वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.