'हर हर शंभू' फेम फरमानी नाझचं गाणं Youtube वरून हटवण्याचं कारण समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'हर हर शंभू' हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

Updated: Aug 12, 2022, 03:07 PM IST
'हर हर शंभू' फेम फरमानी नाझचं गाणं Youtube वरून हटवण्याचं कारण समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : 'हर हर शंभू' हे गाणं गात रातोरात चर्चेत आलेला फरमाणी नाझ (Farmani Naaz) अडचणीत आली आहे. फरमाणीवर गाणं चोरऱ्याचा आरोप आहे. या गाण्याचे लिरिक्स हे जीतू शर्मानं लिहिले असून त्यानेच फरमाणीवर चोरीचा आरोप केला आहे. तर जीतूनं 'हर हर शंभू' या गाण्याशी संबंधित संपूर्ण सत्य सांगितले आहे. जीतूनं फरमाणीशी संबंधित सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. 

आणखी वाचा : मुलांचे फोटो काढणाऱ्यांना पाहून सूर्याचा संताप अनावर, रागाच्या भरात त्यानं काय केलं, Video Viral

एका मुलाखतीत लेखक जीतू या विषयी म्हणाला, 'फरमाणीनं हे गाणं 23 तारखेला यूट्यूबवर प्रदर्शित झालं. आमचं गाणं, रिदम, कंपोजिशन, अगदी व्हिडिओ डिसक्रिप्शनमध्येही माझं नाव टाकलं नाही. तरी मला काही अडचण नव्हती, पण जेव्हा तिनं हे गाणं तिच्या स्वतःचं ओरिजिनल आहे असं सांगितलं तेव्हा मला ते आवडले नाही.

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

जीतूनं पुढे सांगितलं की, 'त्यानंतर मी यूट्यूबवर लीगल क्लेम सबमिट केला. त्यानंतर जवळपास 7-8 दिवसांनी पडताळणी झाली आणि अखेर 11 ऑगस्ट रोजी तिचं गाणं यूट्यूबवरून हटवण्यात आले.

आणखी वाचा : ल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

फरमाणीला सलमान खानच्या 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) शो ची ऑफर मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा झाला आहे. या मुलाखतीत फरमाणीच्या भावाने सांगितले की, त्याच्या बहिणीला 'बिग बॉस'ची ऑफर मिळाली आहे. मात्र आतापर्यंत फरमाणीने या शोमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेतलेला नाही. यासोबतच तिच्या भावाने हे देखील सांगितले की, फरमाणीला भांडणं अजिबात आवडत नाही, तर सलमान खानच्या शोमध्ये खूप भांडणं होतात.