VIDEO : Kiara Advani ला लगीन घाई! खास दोस्ताबरोबर पोहोचली जैसलमेरला
Kiara Advani आणि Manish Malhotra चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लग्नाच्या आधीच्या तयारीसाठी ते दोघं लवकर जैसलमेरला पोहोचले आहेत.
Kiara Advani Viral Video Before from Jaisalmer Wedding: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. कियारा आणि सिद्धार्थ हे राजस्थान जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कियारा लग्नासाठी जैसलमेरला पोहोचली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
कियाराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत कियारा आणि तिच्यासोबत लोकप्रिय फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) जैसलमेरला पोहोचल्याचे दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यासोबत कियाराच्या भावाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत कियाराचा भाऊ हा जैसलमेरला पोहोचला असून गाडीत बसल्याचे दिसत आहे.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, संगीत समारंभाच्या रात्री कियारा आणि सिद्धार्थ काला चष्मा, बिजली, रंगासारी, डिस्को दिवाने या गाण्यांवर डान्स करणार आहेत. सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra Marriage Date) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Updates) अशा अनेक गोष्टी त्यांचे चाहते सर्च करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे दोघे 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.
हेही वाचा : Sidharth Malhotra ला साथ देण्यासाठी निघाली Kiara Advani ; एअरपोर्टवरील 'तो' VIDEO VIRAL
सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले.
या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.