कियारा अडवाणीच्या टीमकडून मोठं वक्तव्य; प्रभासच्या `Spirit` चित्रपटात दिसणार अभिनेत्री?
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी `जुग जुग जिओ` आणि `भूल भुलैया` या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी 'जुग जुग जिओ' आणि 'भूल भुलैया' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 'भूल भुलैया 2' या महिन्याच्या 20 तारखेला रिलीज होणार आहे, तर 'जुग जुग जिओ' 24 जूनला रिलीज होणार आहे. आज या चित्रपटातील सगळ्या पात्रांच्या परिचयाच्या क्लिप सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. बरं, आणखी एक चित्रपट होता ज्यासाठी कियारा हेडलाईनमध्ये आहे.
खरंतर, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की ती संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी 'स्पिरिट' चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. मात्र, आता या अफवा कियाराच्या टीमने फेटाळून लावल्या आहेत.
कियाराच्या टीमनं सांगितलं आहे की, कियाराला प्रभाससोबतच्या चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आलेला नाही. याबाबत तिच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही कोणत्याही अपडेटबद्दल अधिकृत घोषणा करू आणि प्रत्येकाला त्याबद्दल कळवू. त्यामुळे सर्वांनी अफवा पसरवण्यापासून दूर राहावं ही विनंती.
प्रभासच्या 'स्पिरिट' चित्रपटासाठी कियाराला अप्रोच करण्यात आलं नव्हतं.
प्रभाससोबत स्क्रीन शेअर केल्याची बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री कियारा अडवाणीचे चाहते खूप खूश झाले होते. मात्र, आता या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं दिसत आहे. आज कियाराच्या टीमच्या एका वक्तव्याने सगळ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
कियाराच्या टीमने सांगितलं की, कियाराला प्रभाससोबतच्या चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आलेला नाही. याबाबत तिच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही कोणत्याही अपडेटबद्दल अधिकृत घोषणा करू आणि प्रत्येकाला त्याबद्दल कळवू. त्यामुळे सर्वांनी अफवा पसरवण्यापासून दूर राहावं ही विनंती.