Pathan controversy : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पदूकोणच्या (deepika padukone) पठाण चित्रपटावरुन सध्या नवा वाद पेटला आहे. या चित्रपटातील नुकत्याच रिलीज झालेल्या बेशरम रंग या गाण्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याला कारण ठरलं आहे या गाण्यात दीपिका पदूकोणने घातलेली केसरी रंगाची बिकीनी. केसरी रंगाच्या बिकीनीवरुन हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या आहेत. विविध ठिकाणी पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सुरुय. तर काही ठिकाणी शाहरुख खानच्या विरोधात आंदोलनं सुरु आहेत. यामध्ये आता भाजप नेत्यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू असाल तर पठाण चित्रपट पाहू नका


मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटाच्या विरोधात इशारा दिला होता. त्यानंतर आता भोपाळमधील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (sadhvi pragya singh thakur) यासुद्धा पठाण चित्रपटातील गाण्यावरुन चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत. जर तुम्ही खरोखरच हिंदू असाल तर पठाण चित्रपट पाहू नका. पोटावर लाथ मारून त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करा. भगव्याचा अपमान करणार्‍यांची तोंडे फोडून हातात दिली जातील, असा इशारा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिला आहे.


 भगव्याचा अपमान करणाऱ्याचे तोंड फोडायची हिंमत ठेवा


"पठाण चित्रपटात भगव्याचा अपमान करण्यात आला आहे त्यामुळे हा चित्रपट कधीही पाहू नये असे आवाहन करते. जर तुम्ही खरे हिंदू असाल आणि तुमच्या रक्तात अभिमान असेल तर तुम्ही हा चित्रपट चालू देणार नाही. हिंदूंना भाषण स्वातंत्र्य नाही. जेव्हापासून पंतप्रधान मोदी सत्तेत आलेत, तेव्हापासून हिंदू जिवंत असल्याचा विश्वास ठेवायला सुरुवात केली, पण तरीही बदला घेण्याची हिंमत अजून आलेली नाही. भगव्याचा अपमान करणाऱ्याला भाजप आणि जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे.  आता कुणी भगव्याचा अपमान केला तर त्याचे तोंड फोडून हातात ठेवण्याची हिंमत ठेवायला हवी," असे विधान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.


नेमका वाद काय?


'पठाण' सिनेमात 'बेशरम रंग' नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊॉफिट घातल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकनीवरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचे रंगात परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून 'पठाण' चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे.