चार मुलांची आई असणारी अभिनेत्री समुद्रकिनारी Boyfriend सोबत रोमँटिक; Photo तुफान व्हायरल
प्रेमाला आणि सुंदर दिसण्याला वयाची मर्यादा नसते असं म्हणतात.
मुंबई : प्रेमाला आणि सुंदर दिसण्याला वयाची मर्यादा नसते असं म्हणतात. काही व्यक्तींकडे पाहिल्यावर लगेचच ही बाब पटते. वयाचा आकडा या व्यक्तींना दूरदूरपर्यंत स्पर्शही कर नाही, हेच त्यांना पाहून लक्षात येतं.
अशाच व्यक्तींमध्ये येणआरं एक गाजलेलं नाव म्हणजे किम कार्दशियन (Kim Kardashian) चं. किम कायमच तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांना घायाळ करत असते. नो मेकअप असो किंवा मग अगदी मेट गालाच्या रेड कार्पेटवरचा तिचा लूक असो. नजरा वळवण्यात ती कुठंच मागे पडत नाही. (Kim Kardashian flaunts bikini look as she spends time with boyfriend Pete Davidson)
सध्या किम पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचे काही नवे फोटो. चार मुलांची आई असणारी किम सध्या तिचा प्रियकर पीट डेविडसन (Pete Davidson) याच्यासोबत काही खास क्षण व्यतीत करत आहे.
बीच आउटिंगसाठी गेलेली किम प्रियकरासोबत रोमँटिक झाल्याचंही दिसत आहे. निळाशार समुद्र, पांढरीशुभ्र वाळू, नारळाची उंचच उंच झाडं आणि विस्तीर्ण आभाळ अशा सुरेख ठिकाणी किम सध्या फिरण्यासाठी गेली आहे.
समुद्र किनारा आणि प्रेमी युगुलांचं तसं खास नातं. प्रेम व्यक्त करण्यासाठी याहून उत्तम जागा ती काय? किम आणि पीटही अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी धकाधकीच्या आणि सततच्या वातावरणापासून दूर गेले आहेत.
बीचवर गेल्यामुळं किमनं यावेळी बिकीनी लूकला पसंती दिली आहे. या लूकमध्ये किमच्या कमनीय बांध्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. किम गाजलेल्या लूकपैकीच हासुद्धा एक असं म्हणायला हरकत नाही.