Kiran Mane and Rohit Mane together : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळा अभिनेता किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत दिसत आहेत. किरण माने हे त्यांच्या परखड मतासाठी नेहमीच ओळखले जातात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत किरण माने त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सध्या त्यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी ते कोणत्याही विषयावर नाही तर हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित मानेविषयी बोलले आहेत. त्यांनी ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण माने यांनी रोहित मानेसोबतचे काही फोटो शेअर केला आहे. एका फोटोत किरण माने आणि रोहित माने गाडीवर बसले आहेत. तर दुसऱ्या फोटोत रोहित मानेच्या हातात काही पेपर असून किरण माने त्याच्या शेजारी उभे आहेत. हे फोटो शेअर करत किरण माने यांनी कॅप्शन दिलं आहे की “...रोह्या भेटल्या- भेटल्या म्हणाला, अहो किरणसर, चाहते सेल्फी काढायला येतात, तेव्हा कुणीतरी एक प्रश्न हमखास विचारतात, किरण मानेंचे तुम्ही नातेवाईक का? मी म्हंटलं अरे मला बी इचारत्यात, “रोहित माने तुमचा कोन?” मी सांगतो, “लहान भाऊ.” रोह्यानं मिठीच मारली. हास्यजत्रानं मराठीला जी अनमोल रत्नं दिली, त्यातलं हे एक रत्न. ...पहिल्यांदाच भेटलो, पण लई दिवसांची वळख असल्यागत मैत्री झाली. एकतर दोघंबी M.H.11 आणि दुसरं म्हणजे दोघंबी काळजात ‘नाटक’ जपणारे! आता आम्ही अस्सल सातारी ‘माने बंधू’ मिळून एक पिक्चर करतोय. नादखुळा इषय, भन्नाट स्टोरी, जबराट भुमिका. दोन किरानिष्ट बोड्याचे अतरंगी सातारकर एकत्र आल्यावर जाळ धूर व्हायचा त्यो हुनारच हाय. बाकी निर्माता, लेखक, दिग्दर्शक, इतर सहकलाकार याबद्दल हळूहळू सांगेन सविस्तर. आत्ता थोडी उत्सुकता तर तानूद्या की भावांनो. नाय का? पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त !” 



हेही वाचा : एकीकडे 'टायगर 3' प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते 'या' गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला...


किरण माने आणि रोहित माने यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर किरण माने हे बिग बॉसनंतर ‘रावरंभा’ या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर ते आता ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत दिसत आहेत. रोहित विषयी बोलायचे झाले तर तो लवकरच एकदा येऊन तर बघा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय रोहित हा हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो.