Kiran Mane will join Politics : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेते किरण माने हे त्यांच्या परखड मत मांडतात. त्यांच्या पोस्टची आणि त्याशिवाय ते कुठे काही बोलले की त्याची चांगलीच चर्चा होते. आता किरण माने हे राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करत असताना कोणत्या पक्षात जायचंय हे देखील ठरवलं आहे. किरण माने हे शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या पक्षातून पदार्पण करणार आहेत. आज किरण माने यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मातोश्रीवर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण माने हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. यावेळी बीडसह, मराठवाड्यातील काही कार्यकर्ते हे देखील आजच पक्षप्रवेश करणार आहेत. फक्त तेच नाही तर घाटकोपर उपविभाग अध्यक्ष नीलेश जंगमही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 


भाजप विरोधी भूमिका घेतल्यानं मालिकेतून दाखवला होता बाहेरचा रस्ता


किरण माने 2022 मध्ये स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो’ या मालिकेत भूमिका साकारत होते. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर भाजपविरोधी भूमिका घेत पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हा वाद खूप वाढला आणि चिघळला होता. मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत भूमिका मांडली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' तर त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असं हॅशटॅग देखील तयार केलं होतं.  त्यानंतर किरण माने त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं पुढाकार घेतला होता. 


हेही वाचा : 'पुरुष एखाद्या स्त्रीला बूट चाटायला...', 'ॲनिमल' च्या यशावर जावेद अख्तरांचं परखड मत


या सगळ्या प्रकरणानंतर किरण माने आता राजकारणात प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत किरण माने शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. किरण माने यांच्या आधी राजकारणात कोणत्या कलाकारांनी प्रवेश केल्या याची देखील आता दुसरीकडे चर्चा सुरु झाली आहे. त्या यादीत खासदार अमोल कोल्हे, अभिनेत्री प्रिया बेर्डे, मेघा धाडे, अक्षया देवधर, अभिनेता हार्दिक जोशी, प्रभाकर मोरे, गार्गी फुले आणि गायक आनंद शिंदे या सेलिब्रिटींची देखील नावे आहेत.