मुंबई : भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी भाजपाचे यापूर्वीचे नेते, पण आता राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तरी झी मराठीच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि किरिट सोमय्या हे समोरासमोर आले, ३५ वर्षांच्या मैत्रीला उजाळा दिला आणि विशेष म्हणजे किरिट सोमय्या यांनी एकनाथ खडसे यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे एकनाथ खडसे नेहमीच पक्षात होत असलेल्या त्रासाबद्दल आपण केलेल्या पक्षातील कामाचे पाढे आतापर्यंत म्हणत होते, तो 'गम'भाजपा नेत्यांनी समजून घेतला आहे, पण यावर कधीही कुणी बोललेलं नाही, पहिल्यांदाच किरिट सोमय्या यावर बोलले आहेत.


किरिट सोमय्या यांच्याकडून एकनाथ खडसे यांना सलाम का?


एवढंच नाही त्यांनी भाजपा वाढवण्याच्या कार्याला देखील सलाम केला आहे. पाहा खाली किरिट सोमय्या नेमकं काय म्हणाले...

किरिट सोमय्या म्हणाले की, ''पक्षासाठी काम करत असताना, पुढे जात असताना मतभेद आणि मनभेद होतात, पण जळगावमध्ये भाजपा रुजवण्यासाठी एकनाथ खडसे यांनी मोठं काम केलं आहे. दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे असोत, स्वर्गीय प्रमोद महाजन असोत या सर्वांनी महाराष्ट्राच्या तळागाळात भाजपा वाढवली, रुजवली, एकनाथ खडसे यांनी देखील यासाठी कार्यकर्ता ते नेता होईपर्य़ंत मोठं काम केलं आहे, त्याच्या या कार्याला माझा सलाम'' असं भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी म्हटलं आहे.